बारामतीत गावठी हातभट्टी दारू विक्रतेवर कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 1, 2022

बारामतीत गावठी हातभट्टी दारू विक्रतेवर कारवाई..

बारामतीत गावठी हातभट्टी दारू विक्रतेवर कारवाई..                                                   बारामती:- गुणवडीत अवैध गावठी हातभट्टी दारू विक्रेत्यावर सेशन कमिट गुन्हा दाखल,गुणवडी गावात ढेले वस्ती या ठिकाणी संदीप उर्फ दादया तुकाराम सकट वय वर्ष 27 वर्ष. हा त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने. गावठी हातभट्टी दारू आणून. सदरची आरोग्यास धोकादायक असणारी गावठी दारू लोकांना पिण्यासाठी पैसे घेऊन विक्री करत असल्याबाबतची माहिती. मिळाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस फौजदार संजय जगदाळे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर तुषार चव्हाण, माने, ढोले महिला पोलीस कर्मचारी निगडे यांना तात्काळ त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांनी सदर इसमाचे घर व त्याच्या आजूबाजूला असणारी ऊसाची शेती. याची पाहणी केली असता त्याच्या ठिकाणी वीस लिटर गावठी हातभट्टी दारूचा कॅन मिळाला. त्या ठिकाणावरून पिणारे दोन-तीन लोक उसात पळून गेले. पोलिसांची चाहूल लागताच विक्रेता अगोदरच गायब झालेला होता. पोलिसांनी सदर इसमाविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 328. तसेच दारूबंदी कायदा कलम 65 फ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. सुधार गुन्ह्याचा तपास बीट अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार आबा जगदाळे हे करत आहेत. काल रात्री सुद्धा साठे नगर परिसरामध्ये अवैध दारू बाबत कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. बारामती पोलिसांनी 2022 मध्ये माननीय पोलीस उपाधीक्षक यांच्या आदेशान्वये ज्या ज्या ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू मिळून आलेली आहे त्या सर्व केसेस मध्ये भादवी 328 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत. हीच मोहीम पुढेही चालू राहणार आहे.

No comments:

Post a Comment