इंदापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे फेर पंचनामे तात्काळ करावेत अन्यथा रासप कार्यकर्ते प्रति पंचनामा करणार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 7, 2022

इंदापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे फेर पंचनामे तात्काळ करावेत अन्यथा रासप कार्यकर्ते प्रति पंचनामा करणार...

इंदापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे फेर पंचनामे तात्काळ करावेत अन्यथा रासप कार्यकर्ते प्रति पंचनामा करणार...                                           इंदापूर :- ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे इंदापूर तालुक्यामधील डाळिंब पेरू मका तरकारी पपई या पिकांचे मोठे नुकसान इंदापूर तालुक्यामध्ये सर्व दूर झालेले आहे असे असताना सुद्धा या नुकसानीचे पंचनामे करण्यास कृषी विभागामार्फत दिरंगाई केल्याचे त्यांनी दिलेल्या अहवालानुसार दिसून येते इंदापूर तालुक्यामधील 144 गावांमध्ये एकाही गावांमध्ये एकाही गुंठ्यामध्ये कसल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही असा अहवाल कृषी विभागातील व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे यावरून असे लक्षात येते की एकाच दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी बसून दहाच मिनिटांमध्ये पूर्ण तालुक्याचा पंचनामा निरंक दाखवलेला आहे अशावेळी इथले सत्ताधारी आणि स्वतःला विरोधक म्हणून घेणारे राज्यातले सत्ताधारी हे काय झोपा काढता येत का असा सवाल तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये विचारला जातोय येत्या दोन दिवसात जर पंचनामे सुरू झाले नाहीत तर रासप कार्यकर्ते स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या बांधावर जाऊन मोबाईलच्या माध्यमातून प्रति पंचनामे स्वतः करणार आहेत व त्या गावातील कृषी विभागातील कर्मचारी यांना पुष्पगुच्छसहित पंचनामे यांची यादी भेट देणार आहेत. अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोपने यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली यावेळी इंदापूर तालुका संघटक तानाजी शिंगाडे तालुका अध्यक्ष तानाजी मार्कड युवक तालुकाअध्यक्ष आकाश पवारइंदापूर विधानसभा उपाध्यक्ष अविनाश मोहिते इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment