मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये वेगवेगळ्या तीनही स्पर्धेमध्ये रेकॉर्डकरून बारामतीतील रोहित दिलीप शिंदे देशात पहिला..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 10, 2022

मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये वेगवेगळ्या तीनही स्पर्धेमध्ये रेकॉर्डकरून बारामतीतील रोहित दिलीप शिंदे देशात पहिला..!

मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये वेगवेगळ्या तीनही स्पर्धेमध्ये रेकॉर्डकरून बारामतीतील रोहित दिलीप शिंदे देशात पहिला..!                              बारामती:- तामिळनाडू येथील कोईमतूरमध्ये झालेल्या मोटार सायकल स्टंट राईडींगमध्ये वेगवेगळ्या तीनही स्पर्धेमध्ये रेकॉर्डकरून बारामतीतील रोहित दिलीप शिंदे यांनी देशात पहिला क्रमांक मिळवून अव्वलस्थान मिळविले आहे.
  याबाबतची सविस्तर माहिती अशी की, तामिळनाडूमधील कोईमतूर येथील सी.आर.एफ कंपनीने स्टंट वॉरफेर (Stunt Warfere) राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये फ्री स्टाईल स्टंट राईडींग (Freestyle Stunt Riding), ऑफस्टीकल टाईम चॅलेंज (Obstacle Time Challenge) व लास्ट मॅन स्टँडींग (Last Man Standing) या तिन्ही स्पर्धेत अव्वलस्थान पटकाविले आहे. मोटार सायकल एका चाकावर उचलून जास्तीत जास्त गाडी गोल फिरविण्याची ही स्पर्धा होती. केवळ 8 मिनिट 28 सेकंद एवढ्या कमी वेळात एका चाकावर वरील तिन्ही स्पर्धेत रेकॉर्ड केले आहे. तिन्ही स्पर्धेत एकत्रित रेकॉर्ड करणारा रोहित शिंदे हा देशातील स्टंट राईडींगमधील पहिला खेळाडू ठरला आहे.

रोहितने यापुर्वी सन 2018 मध्ये पुणे येथे बजाज पल्सर स्टंट चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले होते. या स्पर्धेमधून राष्ट्रीय स्टंट स्पर्धा केरळमध्ये घेण्यात आल्या होत्या यामध्ये त्याचा तिसरा क्रमांक आला होता. सन 2019 मध्ये शर्टर गइर (Shutter Gears) या कंपनीने हैद्राबाद येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्टंट स्पर्धेत फ्री स्टाईल बायकिंग (Freestyle Biking Competition) मध्ये त्याने देशामध्ये थ्रीएक्स टाईम नॅशनल  (3x Time National Champion) चॅम्पियनशिप मिळविली आहे. 

या स्टंट राईडींग स्पर्धेत केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, हैद्राबाद, मध्यप्रदेश, गुजरात, जयपूर, नवी दिल्ली, उत्तराखंड, चंदीगड, महाराष्ट्र आदी राज्यातील 60 नामांकित स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये इंटरमेडीयट स्टॉप स्टंट चॅलेंजमध्ये सातारा-कोरेगाव येथील धनराज अनिल बर्गे याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. बर्गे याने मोटार सायकल अधिकाधिक वेळ पुढच्या चाकावर चालविण्याचा विक्रम केला आहे.

No comments:

Post a Comment