*योगासन स्पर्धेमध्ये तालुक्यातील ६५ खेळाडूंचा सहभाग*
बारामती दि. १८ : क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील विविध शाळांमधील ६५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उदघाटन योग गुरु डॉ. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास तालुका क्रीडा अधिकारी अनिल सातव, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे, उपाध्यक्ष संजय होळकर, सचिव अशोक देवकर, क्रीडा शिक्षक व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झालेले स्पर्धक- *१४ वर्ष वयोगट* कृष्णा संदीप काळे, एसपीव्हीएन डे स्कूल शारदानगर, सुनहरी सुमित दोशी, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कुल, *१७ वर्षे वयोगट* सत्यजित दादासाहेब दळवी एसपीव्हीएन डे स्कूल शारदानगर, अनुष्का महादेव धायगुडे, एसपीव्हीएन डे स्कूल शारदानगर, *१९ वर्षे वयोगट* पार्थ सुधीर साळवे सोमेश्वर ज्यू. कॉलेज, श्रृती संदिप आतकरे एसपीव्हीएन ज्यू. कॉलेज शारदानगर.
No comments:
Post a Comment