बापरे..१०० एकर जमीन सावकारीत अडकलेली, शेतकऱ्यांना परत करण्याचे जिल्हा उपनिबंधकांचे आदेश..
जळगाव :-सावकारी पाशात अडकून अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून अनेकांनी आत्महत्या केल्या यामुळे सावकारी करणाऱ्याला चाप बसावा म्हणून प्रशासन प्रयत्न करीत असले तरी सावकारी काही थांबत नसल्याचे दिसत आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की,जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल तालुक्यातील शेतकऱ्यांची अवैध सावकारीत अडकलेली १०० एकर जामीन शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश सावकारांचे जिल्हा निबंधक संतोष बिडवई यांनी दिले आहेत.आदेशाची प्रत १५ शेतकरी व त्यांच्या वारसांना देण्यात आली आहे. राज्यातील पहिलीच मोठी कारवाई असल्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी सांगितले.याकामी सहनिबंधक मंगेशकुमार शहा, रावेर तालुक्याचे सहा. उपनिबंधक विजयसिंग गवळी, शशिकांत साळवे
यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यावेळी जिल्हा
उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिलेली माहिती अशी की, गैरअर्जदार व अर्जदार १५ शेतकरी यांच्यात झालेला व्यवहार हा सावकारीच्या अनुषंगाने झाला आहे. नोंदणीकृत दस्ताऐवजा बाबतच्या महसूल नोंदी अवैध घोषित करून रद्द करण्याचे आदेश दिले असल्याचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी सांगितले. एकूण १५ प्रकरणात एकूण ३८ हेक्टर ३७.५८८ आर
शेतजमीन व १५८.६३ चौ. मी. प्लॉट परत करण्याचे आदेश पारीत केले आहेत. तसेच तीन गैरअर्जदार यांच्यावर रक्कम रु. १ कोटी ८५ लाख ३५ हजार निश्चित करण्यात आले आहेत. सदर निश्चित केलेले मुल्य महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ कलम १७(५) मधील तरतुदीनुसार गैरअर्जदार मुरलीधर काशिनाथ राणे यांनी एकूण रु.९० लाख ५८
हजार, गैरअर्जदार नंदकुमार मुकुंदा पाटील यांनी एकूण ८१ लाख ९७ हजार तसेच गैरअर्जदार दिलीप सुखदेव पाटील यांनी १२ लाख ८० हजार रुपये अर्जदार रविंद्र भागवत जावळे यांना देण्याची कारवाई करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment