धक्कादायक..जमीनीचा शासकीय मोबदलासाठी 1लाखाची लाच घेताना उपजिल्हाधिकारी, वकील, वरिष्ठ लिपीक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात... बुलडाणा :- लाच घेणाऱ्या अधिकारी व इतरांचा सहभाग वाढतच चाललेला असल्याने अनेक प्रकरणे उघडकीस येत आहे,नुकताच एक प्रकरण पुढे आले, प्रकल्पात गेलेल्या वडिलोपार्जीत जमीनीचा शासकीय मोबदला देण्यासाठी 2 लाख 17 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी एक लाख रुपये लाच घेताना उपजिल्हाधिकारी (भुसंपादन मध्यम प्रकल्प), वकील आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक यांना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.बुलढाणा एसीबीने ही
कारवाई बुधवारी (दि. 28) केली,उपजिल्हाधिकारी भिकाजी शेषराव घुगे( वय 56 ),लिपीक नागोराव महादेवराव खरात (वय-47 रा. सत्यम अपार्टमेंट, सुंदरखेड ता. जि. बुलढाणा), वकील अनंत शिवाजीराव देशमुख (वय- 32 रा. मोताळा ता. मोताळा जि.
बुलढाणा) अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत नांदुरा तालुक्यातील हिंगणा इच्छापुर येथील 18 वर्षीय व्यक्तीने बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.तक्रारदार यांची वडिलोपार्जित जमीन जिगाव प्रकल्पात गेली आहे. या जमिनीचा शासकीय मोबदला मिळवून देण्यासाठी लिपीक नागोराव खरात यांनी तक्रारदार यांना उपजिल्हाधिकारी यांना 2 लाख 17 हजार रुपये देण्यास सांगितले. दरम्यान, तडजोडीअंती भिकाजी घुगे यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदार यांनी बुलढाणा एसीबीकडे याबाबत तक्रार केली.बुलढाणा एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि. 26)
पडताळणी केली.त्यावेळी भिकाजी घुगे यांनी दोन लाख 17 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती एक लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले. पथकाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला. उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी लाचेची एक लाख रुपये रक्कम वकिल अनंत देशमुख यांच्याकडे देण्यास सांगितले.घुगे यांच्या सांगण्यावरुन देशमुख यांना तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.यानंतर भिकाजी घुगे आणि लिपीक नागोराव खरात यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र पोलीस अधिक्षक मारुती जगताप अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत , पोलीस उप अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम एसीबीचे पोलीस
उपअधीक्षक गजानन शेळके,पोलीस निरीक्षक महेश भोसले,पोलीस अंमलदार विलास साखरे,नितीन तवलारकर, प्रवीण बैरागी, जगदीश पवार,विनोद लोखंडे, चालक अरशद शेख यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment