धक्कादायक...अल्पवयीन मुलाला शारीरिकसंबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 6, 2022

धक्कादायक...अल्पवयीन मुलाला शारीरिकसंबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल...

धक्कादायक...अल्पवयीन मुलाला शारीरिक
संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल...                                          चाकण:-गावाकडे आलेल्या अल्पवयीन मुलाला शेतात नेऊन केलेल्या कृत्याची मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलासोबत गैरवर्तन
करून त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग
पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार म्हाळुंगे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एप्रिल 2022 मध्ये
खराबवाडी येथील चाकण-तळेगाव रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या मागे घडला आहे.याबाबत पीडित मुलाने म्हाळुंगे पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी हे मामाकडे
राहण्यास आले होते. त्यावेळी आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख झाली. फिर्यादी आणि आरोपी फोनवर बोलत असताना आरोपी तरुणीने फिरायला जाऊ असे सांगत फिर्यादी यांना बोलावून घेतले. त्यानंतर ते दोघे चाकण तळेगाव मार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या मागे जाणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर गेले.एका शेतात गप्पा मारत असताना तरुणीने अल्पवयीन
मुलासोबत गैरवर्तन करत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी करीत
आहेत.

No comments:

Post a Comment