*जिद्द मेहनत कष्टाच्या जोरावर वयाच्या 26व्या वर्षी अमित शिंदे झाला पोलीस उपनिरीक्षक* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 9, 2022

*जिद्द मेहनत कष्टाच्या जोरावर वयाच्या 26व्या वर्षी अमित शिंदे झाला पोलीस उपनिरीक्षक*

*जिद्द मेहनत कष्टाच्या जोरावर वयाच्या 26व्या वर्षी अमित शिंदे झाला पोलीस उपनिरीक्षक*
बारामती:- शरद शिंदे मुळचे शिरसुफळ गावचे परंतु 20 वर्षापूर्वी कामानिमित्त बारामतीत आले, त्यांचा मूळ व्यवसाय हा जेन्ट्स शिवणकाम होता व त्यातून होणाऱ्या उत्पन्नातून ते आपला व संसाराचा गाडा पुढे नेत होते ,दरम्यानच्या काळात मणक्याच्या त्रास होत होता म्हणून शिवणकाम सोडले व आमचे मेदडचे मोठे साडू भाऊ दीपक कांबळे यांच्याकडे गवंडी काम करून आपल्या दोन मुलांचे शिक्षण पूर्ण करत असतानाच या कामात प्रचंड शारीरिक ताण असल्याने त्यांनी हे काम सोडले, *अर्थातच दीपक कांबळे त्यांनी सख्या भावाप्रमाणे साथ दिली* व नंतरच्या काळात(शरद शिंदे व अलका शिंदे )या दोघांनीही cotonking या कंपनीमध्ये नोकरीस सुरवात केली, दरम्यानच्या काळात मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन *मोठा मुलगा अमित हा दौंड येथे srpf मध्ये 2016 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी नोकरीस लागला* ,आई वडिलांचा आनंद गगनाला भिडला कारण आपल्या घरात पहिलाच मुलगा नोकरीस लागला होता पुढे जाऊन अमित याचे लग्न झाले व पुत्र प्राप्तीही झाली सर्व घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले, अशातच लहान मुलगा विकी याचेही लग्न झाले व विकिसुद्धा आपल्या आईवडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्याच कंपनीत काम करू लागला, दरम्यानच्या काळात अमित मोठी स्वप्ने पाहू लागला होता त्याला आपल्या खात्यातच वरची पोस्ट हवी होती म्हणून 6 महिन्याची सुट्टी घेऊन दिवस रात्र अभ्यास करून mpsc ची खातेअंतर्गत परीक्षा दिली, आव्हान म्हणावं तेवढ सोपे नव्हते पण अमितने जिद्द, चिकाटी व अभ्यासाच्या जोरावर *लेखी परीक्षेत 239मार्क मिळवली व ग्राउंडला 100 पैकी 100  मार्क्स मिळून* ते करून दाखवलं व एक गरीब घरातील पोरं *पोलिस उपनिरीक्षक(फौजदार)* झाले यापेक्षा दुसरा आनंद त्याच्या आई वडिलांना कुठला असू शकतो ,अर्थातच आई वडिलांचे संस्कार, कष्ट, आशीर्वाद याशिवाय हे शक्य नव्हते.

No comments:

Post a Comment