तलाठी 30 हजारांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात...
वाशिम:-लाचखोरीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत असताना अशीच एक लाचखोरीचे प्रकरण पुढे आले याबाबत माहिती अशी की, बक्षिसपत्राद्वारे वडिलोपार्जित जमीन दुसऱ्याच्या नावावर करून देण्यासाठी तलाठ्याने रुपये तीस हजारांची लाच मागितल्याचा प्रकार
वाशिमधील वडगाव ठिकाणी घडला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार ACBने सापळा कारवाई करत लाचखोर तलाठ्यास ताब्यात घेतले आहे.या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आजीच्या नावावर असलेली 5 एकर शेती बक्षीसपत्राद्वारे आजीच्या पणतूच्या नावावर करण्यासाठी बक्षीसपत्र करून त्याची फेरफारला नोंद
करण्याकरिता तलाठी आशिष प्रदीप सावंगेकर (वय 32, रा. गणेश वार्ड, पुसद जि. यवतमाळ) यांनी दि. 13 डिसेंबर 2022 रोजी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर त्यांनी तडजोडीअंती 41 हजार रुपये स्वीकारण्यास अनुमती दाखवली. तसेच प्रथम 30
हजार रुपये देऊन नंतर फेरफार नोंद झाल्यावर 11 हजार देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास माहिती दिली. विभागाने 14 डिसेंबर 2022 रोजी सापळा कारवाई करत 30 हजार रुपये लाच स्वीकारताना तलाठी आशिष सावंगेकर यांना रंगेहात अटक केली.सावंगेकर यांना ACB च्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून लाच रक्कम जप्त करण्यात आली आहे.
त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मारोती जगताप,अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत,अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक गजानन आर शेळके,पोलीस हवालदार नितिन टवलारकर, विनोद अवगळे,विनोद मारकंडे, दुर्गादास जाधव पोलीस नाईक रविंद्र घरत,योगेश खोटे यांनी केली.
No comments:
Post a Comment