बापरे.. पुरुषांच्या शौचालयात 35 हजार रुपये लाच घेतली,महिला नायब तहसीलदाराला अँटी करप्शनने पकडले रंगेहाथ...! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 21, 2022

बापरे.. पुरुषांच्या शौचालयात 35 हजार रुपये लाच घेतली,महिला नायब तहसीलदाराला अँटी करप्शनने पकडले रंगेहाथ...!

बापरे.. पुरुषांच्या शौचालयात 35 हजार रुपये लाच घेतली,महिला नायब तहसीलदाराला अँटी करप्शनने पकडले रंगेहाथ...!
 नाशिक :- प्रशासकीय इमारत मधील शासकीय अधिकारी व कर्मचारी लाच घेताना अनेकवेळा पकडले गेले असल्याचे बातम्या वाचल्या असतीलच पण चक्क पुरुषांच्या शौचालय मध्ये लाच घेतली याबाबत समजलेली माहिती अशी की,एक महिला निवासी नायब तहसीलदार लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.ही करावाई नाशिक एसीबीच्या पथकाने केली असून निफाड तालुक्यातील निवासी नायब तहसीलदार कल्पना शशिकांत निकुंभ असे महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.मागील आठवड्यात नाशिकच्या महावितरण विभागातील तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता निवासी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना नाशिक एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. निकुंभ यांच्यासह तहसील कार्यालयातील कोतवाल अमोल राधाकृष्ण कटारे याला देखील एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. निफाड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आणि कोतवाल याने 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ताडजोडीअंती 35 हजार रुपये देण्याचे ठरले होते. 35 हजार रुपये लाच स्वीकारताना दोघांना ताब्यात घेण्यात आले.तक्रारदार यांचे चुलत आजोबा व इतर यांचे मौजे पिंपळगाव येथील जमीनीचे क्षेत्र बिनशेती करण्यासाठी अर्ज केला होता.अर्जाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रकरणातील कार्यालयीन टिप्पणीवर सही करून हे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे सादर करण्याच्या मोबदल्यात नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी तक्रारदार यांच्याकडे 40 हजार रुपये लाचेची मागणी केली.तडजोड अंती 35 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले.तसेच यातील निवासी नायब तहसीलदार निकुंभ यांच्या सांगण्यावरून कोतवाल कटारे यांनी प्रशासकीय इमारतीमधील पुरुष प्रसाधन गृहात 35 हजार रुपये लाच स्वीकारताना नाशिक एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

No comments:

Post a Comment