4 विध्यार्थ्यांवर सुरू झालेली शाळा भविष्यात इतिहास घडवेल - योगेश नालंदे. दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 25, 2022

4 विध्यार्थ्यांवर सुरू झालेली शाळा भविष्यात इतिहास घडवेल - योगेश नालंदे. दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

4 विध्यार्थ्यांवर सुरू झालेली शाळा भविष्यात इतिहास घडवेल - योगेश नालंदे.
दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन  उत्साहात साजरे

 
फलटण(प्रतिनिधी): - फलटण तालुक्यातील  साखरवाडी मध्ये असणाऱ्या दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूल चा पहिला वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बारामती मधील पत्रकार व योद्धा प्रोडक्शनचे मालक योगेश नालंदे व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर तसेच दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन श्री दत्तात्रय भारत शिंदे सर, स्कूलचे उपाध्यक्ष श्री नवनाथ भारत शिंदे सर श्री अजिंक्य भारत शिंदे सर तसेच  दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम उपस्थित होत्या. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले . त्यानंतर प्रमुख पाहुणे व सर्व शिक्षक स्टाफ तसेच स्कूल बसचे कर्मचारी या सर्वांचा सत्कार चेअरमन शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
   यावेळी बोलताना नालंदे म्हणाले कि, कोरोना परिस्थितीत सुरू झालेल्या या शाळेतील विध्यार्थ्यांची प्रगती उल्लेखनीय आहे. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांची चिकाटी व परिश्रम व शिकवण्याची पद्धत पाहता शाळेतील विध्यार्थी एकदिवस इतिहास घडवतील असा विश्वास व्यक्त केला. आजचे विद्यार्थी उद्याचे जागृत नागरिक असतात त्यामुळे समाज घडवण्यामध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो असे मत माडकर यांनी व्यक्त केले. त्यानंतर नृत्य कार्यक्रम चालू झाला. या कार्यक्रमांमध्ये प्रथम गणेश वंदना सादर करण्यात आली. त्यानंतर कोळीगीत, धनगर गीत, शेतकरी गीत, आर्मी गीत, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक अशा वेगवेगळ्या कला नृत्यातून आपले कला गुण मुलांनी सादर केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम, स्कूल इन्चार्ज शितल कुंभार, शिवगंगा पवार , सविता जगताप, वर्षा खोमणे , रोहिणी ठोंबरे, रेणुका कुंभार, पल्लवी भापकर, सुषमा गायकवाड उपस्थित होते. सुधीर नेमाणे यांच्या बहारदार सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमात रंगत आली. साखरवाडी परिसरात पहिल्यांदाच एखाद्या शाळेचे स्नेहसंमेलन एवढ्या दिमाखात साजरे होत होते त्यामुळे पालक व गावकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

No comments:

Post a Comment