हिस्ट्रीसीटर कडून शहरातील घरफोडी उघड..बारामती शहर पोलीसाची कारवाई. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 1, 2022

हिस्ट्रीसीटर कडून शहरातील घरफोडी उघड..बारामती शहर पोलीसाची कारवाई.

हिस्ट्रीसीटर कडून शहरातील घरफोडी उघड..बारामती शहर पोलीसाची कारवाई.
बारामती:- दिनांक 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सौ.निता प्रफुल्ल चव्हाण  वय 36 वर्ष धंदा गृहिणी रा.शक्ती चेबर चव्हाण चाळ घर न 27 आमराई बारामती यांचे दरवाजा व कपाट उचकटून. घरफोडी करून अज्ञात आरोपीने   1) 8000/रुपये रोख रक्कम त्यामध्ये 500 रुपये
 दराच्या एकूण 16 नोटा भारतीय चलनातील
2)61080/रुपये किमतीचे एक तोळा अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण त्यात एक वाटी व 12 खरबुजाचे सोन्याचे मन्यातील व कळ्या मनातील गंठण
3)20177/रुपये किमतीचे चार ग्रॅम दहा मिली वजनाचे पिवळ्या सोन्याची अंगठी
4)3500/रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची लहान मुलाची डिझाईनची सोन्याची अंगठी
5)1200/रुपये किमतीचे एक चांदीचे ब्रेसलेट डिझाईनचे व साखळीचे
6)600/रुपये किमतीचे एक चांदीचे डिझाईनची लहान मुलाची अंगठी
7)4800/रुपये किमतीची तीन नग नाकातील नथ सोन्याचे तारेतील
8)3000/रुपये किमतीचे चार जोडी चांदीचे पायातील
9)15300/रुपये किमतीचे अडीच ग्रॅमच्या सोन्याच्या कानातील रिंगा डिझाईनच्या
10)4000/रुपये किमतीची कमरेची चांदीची साखळी
एकूण- 1,21,657/रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम ऐवज चोरून नेला . 
सकाळी फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतरबारामती शहर पो स्टे गु र न- 593/2022 भादंवि कलम 457,380 प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून सदर घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांच्यासह भेट दिली. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ तपासी अधिकारी व पुणे शोध पथकाला रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगार चेक करण्याचे आदेश दिले. गुन्हेगारांची चेकिंग करत असताना बारामती शहर पोलीस स्टेशनचा परंतु गेले काही दिवस काही वर्ष निष्क्रिय असलेला सचिन राजू जवारे वय 36 राहणार वडके  नगर अमराई यास पोलीस ठाण्यास आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. सदर आरोपीला माननीय न्यायालयासमोर उभे करून तीन दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली पोलीस कुठली दरम्यान सदर आरोपीकडून वर नमूद चोरी झालेले दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत. या आरोपीने आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का याबाबत ही तपास सुरू आहे याच्यावर पूर्वीचे सहा गुन्हे चोरी जबरी चोरी घरपोडी  शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सदर महिलेचे दागिने तात्काळ मिळाल्याने तिने पोलिसांचे आभार मानले
सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, कुलदीप संकपाळ तपासी पथकाचे पोलीस हवालदार शिंदे,अंमलदार पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस नाईक तुषार चव्हाण, पोलीस अंमलदार सिताब, राणे ,जामदार ,इंगवले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment