विधी संघर्षग्रस्त बालकांकडून सहा मोटरसायकली जप्त... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 10, 2022

विधी संघर्षग्रस्त बालकांकडून सहा मोटरसायकली जप्त...

विधी संघर्षग्रस्त बालकांकडून सहा मोटरसायकली  जप्त...
बारामती:- जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी जात असल्यामुळे त्याचा अभ्यास करून चोरीचा पॅटर्न ठरवून वेळ ठरवून त्या ठिकाणी पाळत लावून सदरचे गुन्हे उघड आणण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे बारामती शहर पोलीस ठाणे हद्दीत दुपारच्या वेळेस मार्केट भागात रेकी करून गस्त करत असताना पोलिसांना एक विधी संघर्ष ग्रस्त बालक ताब्यात घेतला सदर बालक काने  त्याने दौंड पोलीस ठाणे एक मोटरसायकल भिगवण पोलीस ठाणे दोन मोटरसायकल बारामती शहर पोलीस ठाण्यातील तीन मोटरसायकल चोरल्याचे पोलिसांना सांगितले त्याने सदरच्या मोटरसायकली त्याच्या नातेवाईकांच्या घरी ठेवल्या होत्या आणि ते विक्रीच्या तयारीत होते त्या सर्व मोटरसायकली बारामती शहर पोलीस ठाणे ने जप्त केलेले आहेत या कारवाईमध्ये दौंड पोलीस ठाणे गुन्हा नंबर 15/ 22 भिगवण पोलीस ठाणे गुन्हा नंबर 220/, 22 265/, 22 बारामती शहर पोलीस ठाणे गुन्हा नंबर 583/ 22  , 437/ 21 5/22 भादवी 379 हे गुन्हे उघड केलेले आहेत एकूण तीन लाख रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त केलेले आहेत.
सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, प्रकाश वाघमारे, पोलीस अंमलदार रामचंद्र शिंदे, दशरथ कोळेकर, अशोक सीताप, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, जमादार शाहू राणे यांनी केलेली आहे.
बारामती पोलीस स्टेशन मार्फत आवाहन करण्यात येत आहे की, सदर विधी संघर्ष ग्रस्त बालकाने प्रामुख्याने खालील प्रकारच्या मोटरसायकली चोरलेले आहेत. 1)ज्या मोटरसायकली दोन ते तीन वर्षे वापरल्यानंतर त्याला सहज कोणतीही दुसरी चावी लागून ती मोटरसायकल सुरू होते.
2)अनेक जण बाजारात गेल्यानंतर घाईगडबडीमध्ये हँडल लॉक करत नाहीत
3)तसेच व्हील लोक मोटरसायकल असणे आवश्यक आहे त्यामुळे व्हील लोक काढणे चोराला जमत नाही.
4)गाडी सुरक्षित ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी पार्क करावी. 5)घाईगडबडीत कुठेही पार्किंग करू नये तसेच आता अनेक दुकानात सीसीटीव्ही उपलब्ध आहेत सीसीटीव्हीच्या निग्रणीत मोटरसायकल पार्क करावी. 
6) थोडा उशीर झाला तरी चालेल ते आणि पार्किंग या ठिकाणी सीसीटीव्ही उपलब्ध आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित पार्किंग करावी.
7) सर्व हाऊसिंग सोसायटी यांनी आपल्या पार्किंग तळामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये वर्गणी काढून सीसीटीव्ही बसवावेत त्याच्यातील एक कॅमेरा मुख्य लोखंडी प्रवेशद्वारावर बसवावा

No comments:

Post a Comment