शोषित वंचित समाज हाच गोपिनाथ मुंडे यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता- शिवानंद हैबतपूरे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 13, 2022

शोषित वंचित समाज हाच गोपिनाथ मुंडे यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता- शिवानंद हैबतपूरे

शोषित वंचित समाज हाच गोपिनाथ मुंडे यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता- शिवानंद हैबतपूरे

बारामती:- दि.१२ डिसेंबर २०२२ 
लोकनेते गोपिनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील बहुजन समाजाला मिळालेले अभुतपुर्व असे नेतृत्व होते. सर्वसामान्य उसतोड कामगाराच्या कुटुंबात जन्माला येऊन स्वकर्तुत्वाने प्रस्थापित व्यवस्थेला प्रचंड आव्हान देणारे गोपीनाथराव हे ऊर्जेचे स्त्रोत होते.  शेवटच्या तळागाळातील कार्यकर्त्याला सोबत घेऊन त्याला बळ देणारे हे नेतृत्व म्हणूनच महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांना आपले नेतृत्व वाटले. राष्ट्रनिर्माण व व्यक्ती निर्माण करणार्या संघसंस्कारात घडलेल्या मुंडे साहेबांच्या राजकारणाला संघर्षाची जोड होती. गोरगरीब कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सतत संघर्ष करणार्या गोपिनाथ मुंडेंच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा शोषित वंचित समाज होता असे मत भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपूरे यांनी व्यक्त केले. बारामती येथील मल्हार क्लबच्या वतीने आयोजित आठवणीतले गोपिनाथ मुंडे साहेब या विषयावर बोलताना हैबतपूरे म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणाची खूप मोठी समृद्ध परंपरा आहे. राजकारणात मतभेद असु शकतात, स्पर्धा असु शकते पण द्वेषाची भावना मात्र असता कामा नये हा आदर्श वस्तुपाठ मुंडे साहेबांनी घालून दिला. ज्यावेळी गोपिनाथ मुंडे राजकारणात सक्रिय झाले त्याकाळी राजकारणात मोठ्या प्रमाणावर अस्पृश्यता होती. ती राजकीय अस्पृश्यता मोडीत काढून सकल बहुजनांना सोबत घेऊन मुंडे साहेबांनी भारतीय जनता पक्ष वाढवला. सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भाजपा विस्तारित केला. मग त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा आम्हा नवतरुण कार्यकर्त्यांना आदर्शवत आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी कशी पार पाडायची हे मुंडे साहेबांकडुन  शिकलं पाहिजे.  जिल्हा परिषदे पासून ते दिल्ली पर्यंत विजयी घौडदैड करणारे हे नेतृत्व म्हणजे मराठवाड्याचे वैभव होते. ते महाराष्ट्राच्या राजकारणाचे मानबिंदू होते. विधीमंडळातील भाषण असो की मग जाहीर सभेतील भाषण असु देत मुंडे साहेबांची मांडणी ही नेहमीच समयोचित असायची. महाराष्ट्र विरोधी पक्षाचा नेता कसा असावा हे त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने सिद्ध केले. राजकारणातील गुन्हेगारीकरणावर जबर अंकुश ठेवणारा लोकविलक्षण गृहमंत्री मुंडे साहेबांच्या रुपात महाराष्ट्राने पाहीला. अशा संघर्षयात्रीचा प्रवास हा बहुजन कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असल्याचे मत भाजपा प्रदेश प्रवक्ते  शिवानंद हैबतपूरे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी माजी आमदार विजयराव मोरे, भाजप नेते बाबासाहेब चौरे,मारुतराव वणवे, यशवंत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोनवलकर, भाजपा किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली चौरे,  पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती दिलीप खैरे, बारामती नगर पालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, नवनाथ पडळकर, नगरसेवक विष्णू चौधर, भाजपा तालुका अध्यक्ष पांडुरंग मामा कचरे, बारामती भाजपा शहर अध्यक्ष सतीश फाळके, भाजपा नेते अण्णा शिरदाले,  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आरटीओ परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल पुजाताई मोरे यांचा सत्कार भाजपचे प्रदेश प्रवक्ते मा.शिवानंद हैबतपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड गोविंदराव देवकाते, सूत्र संचालन बाळासाहेबांची शिवसेना बारामती तालुका प्रमुख देवेंद्र बनकर, आभार ॲड रमेश कोकरे, लक्ष्मण घोळवे यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन मल्हार क्लब बारामती यांनी केले.

No comments:

Post a Comment