*आजचा माणूस संतांना मानतो पण संतांचं मानत नाही - नंदकुमार झांबरे*
बारामती (प्रतिनिधी) - महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे साधू संत म्हटलं की डोळ्यासमोर एकप्रकारे आदर्श निर्माण होतो म्हणून इथला प्रत्येक माणूस संतांना मानतो पण संतांनी सांगितलेलं मानत नसल्याची खंत संत निरंकारी मिशन सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी व्यक्त केली.
पडस्थळ (ता. इंदापूर) येथे एका बालकाचे नामकरण आणि एका बालकाचा जन्मदिन या निमित्ताने सोमवारी (ता. १२) निरंकारी सत्संचे आयोजन केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
या बालकांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर मानेजी, संयोजक तथा ज्ञान प्रचारक महादेव शिंदेजी या प्रमुखांसह इंदापूर, बारामती, अकलूज आदी भागांतून मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
श्री. झांबरे पुढे म्हणाले, संतांच्या मुखातून येणारी वचनं ही आमच्यासाठी लाभदायक असून आयुष्याला गतिमान देणारी असतात म्हणून त्यांच्या वचनाचे तंतोतंत पालन करत जीवन जगलं पाहिजे,
मागील संतांचं महत्त्व सांगताना श्री. झांबरे म्हणाले साधू संत हे परोपकारी असतात, स्वसुखाचा त्याग करून इतरांच्या जीवनात सुख प्राप्त करून देण्याचं महान कार्य करतात,
त्यांनी मनुष्याच्या कल्याणा साठीच आपला देह चंदनाप्रमाणे झिजविला आहे. म्हणून आम्ही प्रत्येकजण साधू संतांना मानण्याबरोबर त्यांच्या मुखातून येणाऱ्या अनमोल वचनांना देखील मानलं पाहिजे, तरच आमच्या जीवनामध्ये सुख, समाधान प्राप्त होणार आहे. असेही प्रवचनाच्या शेवटी सांगितले.
सदर सत्संगचे मंचसंचालन सुनील शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार पडस्थळ सत्संगचे प्रबंधक पोपटदादा वाघमोडे यांनी केले.
No comments:
Post a Comment