*श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती येथे मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांची पर्वणी*
बारामती:-रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल येथे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य माननीय सदाशिव बापूजी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन व कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात येत आहे 12 डिसेंबर रोजी सोहळ्याची सुरुवात झाली उद्घाटन दिलीप नाना ढवान पाटील आणि सुरेशशेठ सातव यांच्या हस्ते होऊन सुनील सरतापे यांनी पवार साहेबांच्या राजकीय जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच रयत शिक्षण संस्था आणि पवार साहेब यांची असणारी एक घट्ट वीण विद्यार्थ्यांसमोर मांडली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. 13 डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धा आणि माता पालक मेळाव्याचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमास पोलीस अधिकारी अमृता भोईटे मॅडम तसेच ॲडव्होकेट अश्विनी सातव या उपस्थित होत्या अमृता भोईटे यांनी आजची पिढी माध्यमांच्या आहारी गेली असून त्यांना आपण सांभाळणे आवश्यक आहे. मुलींना स्वसंरक्षणासाठी पोहणे, कराटे यांसारखे धडे देणे गरजेचे आहे.14 डिसेंबर रोजी ग्रंथ प्रदर्शन व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी परबतराव तावरे आणि डी एन घाडगे घाडगे साहेब हे उपस्थित होते या सर्व कार्यक्रमांना मुख्याध्यापक बी. एन. पवार , उप मुख्याध्यापक पी.एन तरंगे ,पर्यवेक्षक बी.ए.सुतार उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन प्रियंका कदम, सुनीता कोकरे, सारिका गवळी, तृप्ती कांबळे, अलका चौधर, सुनिता जाधव, सोनाली जराड, नवनाथ गायकवाड, सतीश वाघ, तानाजी धायगुडे, आर आर मारकड यांनी केले होते.या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद उपस्थित होते*.
No comments:
Post a Comment