जिल्हास्तरीय बुध्दिबळ क्रिडा स्पर्धेत के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कुल च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 2, 2022

जिल्हास्तरीय बुध्दिबळ क्रिडा स्पर्धेत के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कुल च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश..


जिल्हास्तरीय बुध्दिबळ क्रिडा स्पर्धेत के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कुल च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश..

बारामती:- जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी द्वारा आयोजित करण्यात आलेल्या दि. ०२ डिसेंबर २०२२ रोजी नेताजी सुभाषचंद्रबोस स्कुल,  फुलगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुध्दिबळ क्रिडा स्पर्धेमध्ये 14 वर्षांखालील वयोगटातून के. ए. सी. एफ. इंग्लिश मिडीयम स्कुल मधील *विरेन विशाल डहाळे* याने चतुर्थ  क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळविले. 
सदर विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची संघटनेच्या वतीने विभागीय स्पर्धेकरीता निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना श्री. योगेश डहाळे सर व श्री. सचिन माने सर यांचे मार्गदर्शन लाभले असून विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बाबत कौतुकाचा वर्षाव होत असून के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे श्री. प्रशांत (नाना) सातव व मुख्याध्यापिका सौ. नाजनीन शेख व सर्व संचालकांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment