लावणी नर्तिका गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर संपूर्ण महाराष्ट्रभर बंदी घालण्यात यावी:- यशवंत ब्रिगेडची मागणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 22, 2022

लावणी नर्तिका गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर संपूर्ण महाराष्ट्रभर बंदी घालण्यात यावी:- यशवंत ब्रिगेडची मागणी

लावणी नर्तिका गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर संपूर्ण महाराष्ट्रभर बंदी घालण्यात यावी:- यशवंत ब्रिगेडची मागणी 

बारामती:- लावणी नर्तिका  गौतमी पाटील च्या संपूर्ण कार्यक्रमात महाराष्ट्रभर बंदी घालण्यात यावी अशी मागणी यशवंत ब्रिगेड संघटनेने केली आहे  यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी  राज्याचे  मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

 गौतमी पाटील च्या अश्लील  नृत्यामुळे तरुणाईमध्ये चुकीचा संदेश जात असून गौतम पाटील हिने पब्लिसिटीसाठी  महाराष्ट्र मध्ये युवा वर्गाला भुरळ  घातली आहे  महाराष्ट्राला एक सांस्कृतिक परंपरा आहे गौतमी पाटील चे नृत्य कमी अश्लीलता  जास्त असल्याने महाराष्ट्रभर तिच्या कार्यक्रमावर कायमची बंदी घालण्यात यावी महाराष्ट्रातील लावणी परंपरेला व संस्कृतीला छेद देत सार्वजनिक ठिकाणी अश्लील नृत्य सादर करीत असते तिच्या हावभावाचे व्हिडिओ मोबाईल मुळे घराघरात पोहोचतात घरामध्ये माता भगिनी मुल मुली असतात त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे गौतमी पाटील सार्वजनिक ठिकाणी नृत्यांचा नावाखाली अश्लील  वर्तन करत करतात त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ निर्माण होतो तसेच महाराष्ट्रातील कायदा सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे तिच्या कार्यक्रमावर कायमची बंदी घालण्यात यावी.

No comments:

Post a Comment