हनीट्रपमध्ये अभियंत्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, शरीरसंबंध ठेवले,नको त्या अवस्थेत शूट करत अडकवून खंडणी उकळण्याचा घडला प्रकार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 28, 2022

हनीट्रपमध्ये अभियंत्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, शरीरसंबंध ठेवले,नको त्या अवस्थेत शूट करत अडकवून खंडणी उकळण्याचा घडला प्रकार..

हनीट्रपमध्ये अभियंत्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, शरीरसंबंध ठेवले,नको त्या अवस्थेत शूट करत अडकवून खंडणी उकळण्याचा घडला प्रकार..
औरंगाबाद :-हनीट्रप चे प्रकरणे जास्तच वाढत असल्याचे उघडकीस येत असल्याने अधिकारी वर्गात चांगलीच धास्ती बसली आहे, याबाबत नुकताच औरंगाबाद शहरात एका अभियंत्याला हनीट्रपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याच प्रकार घडला आहे.तरुण अभियंत्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले. नंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची मागणी केली. या टोळीला औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे यातील एका आरोपीने मुंबई क्राईम ब्रँचमध्ये अधिकारी
असल्याचं सांगत धमकावल्याचाही स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित 27 वर्षीय तरुणाला आरोपी तरुणीने आपल्या मादक अदा दाखवत जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणासोबत शरीर संबंध बनविले. पुढे आरोपी प्रतिक जाधव व संजय जाधव यांनी कार्यालयीन कुरिअर आल्याच्या बहाण्याने तरुणाला संपर्क केला व पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसवून एका हॉटेल मध्ये घेऊन गेले. तिथे आपण मुंबई क्राईम ब्रँचचा पोलीस निरीक्षक प्रदीप घुगे
असल्याची बतावणी केली. एका महिलेने तुमच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे, अशी खोटी भीती दाखवली.तरुणाचे नको त्या
अवस्थेत व्हिडीओ काढल्याने व  तोतया पोलिसांच्या भीतीने तरुण घाबरला. एवढ्यावरच न थांबता दोघांनी तरुणाला निर्वस्त्र करत व्हिडिओ बनविला. प्रकरण मिटविण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली.या दरम्यान तरुणाजवळील चाळीस हजार रुपये व
टू व्हिलर गाडी दोघांनी नेली. गाडी पाहिजे असल्यास पाच लाख रुपये घेऊन ये, असेही धमकावले. सातत्याने होत असलेल्या ब्लॅकमेलला वैतागून तरुणाने सातारा पोलीस ठाणे गाठत घडलेली हकिगत पोलिसांना
सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सापळा रचून टोळीतील सर्व सदस्यांना अटक केली आहे. आणखी कोणी पीडित तर नाही ना? पोलिसांकडून तपास सुरू ही घटना समोर आल्यानंतर औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेमागे संपूर्ण टोळी काम करत असल्याने आणखी कोणी पीडित आहे का? या अनुशंगाने पोलीस तपास करत आहेत. सोबतच अशा प्रकरणात कोणी अडकले असेल तर पुढे यायला हवं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment