बहूजन समाजसेवा संघ करंजे यांच्या वतीने आयोजित केलेल्या सोमेश्वर पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार अभिनंदन कार्यक्रम संपन्न... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 23, 2022

बहूजन समाजसेवा संघ करंजे यांच्या वतीने आयोजित केलेल्या सोमेश्वर पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार अभिनंदन कार्यक्रम संपन्न...

बहूजन समाजसेवा संघ करंजे यांच्या वतीने आयोजित केलेल्या सोमेश्वर पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार अभिनंदन कार्यक्रम संपन्न...                                                                                                    करंजे ता.बारामती:- बहूजन समाजसेवा संघ करंजे यांच्या वतीने आयोजित केलेल्या सोमेश्वर पंचक्रोशीतील नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांचा सत्कार अभिनंदन कार्यक्रम संपन्न झाला.बहुजन समाजसेवा संघ करंजे अध्यक्ष मेजर पोपटराव हूबरे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती कोतवाल संघटनेचे सल्लागार तानाजीराव जाधव होते.या प्रसंगी  मनोगत व्यक्त करताना करंजे गावचे माजी सरपंच रविंद्र गायकवाड यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.बहुजन समाजसेवा संघाच्या मार्फत अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आयोजित केले जातात. बहुजन समाजसेवा संघ  मार्फत चालवण्यात येत आसलेल्या स्पर्धा परिक्षा वाचनालयात विध्यार्थी ज्ञानाचे धडे घेत आहेत. सुंदर आसा छान  उपक्रम राबविला जातो. त्याबद्दल संस्थेचे गौरउदगार काढले.यावेळी नवनिर्वाचित वाघळवाङी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर कांबळे सोरटेवाङी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शेंङकर करंजे ग्रामपंचायत सदस्य आतुल गायकवाड भगवानदादा सोसायटी संचालक नानासाहेब दगडे शिवाजीराव शेंङकर अनिल हूंबरे विरसेन हूंबरे भगवान भगत पांडुरंग हूंबरे शामराव पाटोळे दादा धुमाळ व स्पर्धा परिक्षा वाचनालयाचे विध्यार्थी उपस्थित होते.तानाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाची खंत व्यक्त केली.कोणताही कार्यक्रम आयोजित करते  वेळी दोन दिवस आगोदर निमंत्रित पाहुणे मंडळींना निरोप गेला पाहीजे.एकाकी कार्यक्रम आयोजित करू नयेत.या सामाजिक उपक्रमाला माझा पाठींबा संस्थेला सर्वतोपरी मदत  मिळवून देण्याची ग्वाही दिली.शिवाजी शेंङकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.विखुरलेला बहुजन समाज जाती पातीत बाटला गेला आहे.हे कुठे तरी थांबले पाहीजे.समाजिक उपक्रम राबवित आसताना सर्वाना बरोबर घेऊन चालले पाहीजे.बहुजन समाजसेवा संघाने चालवलेल्या उपक्रमाला पाठींबा दिला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन रविंद्र गायकवाड यांनी केले आभार विरसेन हूंबरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment