बारामतीचे डॉक्टर फिफा फ़ुटबाँल मध्ये चमकले...
बारामती:- फिफा फुटबॉल स्पोर्ट्स मेडिसिन एक्स्पर्ट तसेच फिफा फुटबॉल ऑलिम्पिक मेडिकल कमिटीचे सदस्य डॉ. रोहन अकोलकर यांनी नुकताच कतार येथे पार पडलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत फिजिओथेरपीस्ट म्हणून महत्वपुर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
या प्रकारची जबाबदारी पार पाडणारे ते भारतातील एकमेव स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट आहेत.
या आगोदर २०१८ साली रशिया येथे पार पडलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्येही डॉ. अकोलकर यांनी फिजिओथेरपीस्ट म्हणून महत्वपुर्ण योगदान दिले आहे. कतार येथे पार पडलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2022 मध्ये फिफाने "बॅकअप मेडिकल टीम" ही व्यवस्था केली होती. तातडीने वैद्यकीय व्यवस्था आवश्यक असेल तिथे हे पथक उपलब्ध होते. या टीम मध्ये स्पेश्यालिस्ट डॉक्टर्सचा समावेश होता. सदर पथक फुटबॉलपटूंना गंभीर स्वरूपाच्या दुखापती किंवा इजा झाल्या तर त्यावर त्वरीत उपाय करीत होते. डॉ. रोहन यांचा फिफा प्रमाणित फुटबॉल स्पोर्ट्स मेडिसिन तज्ञ म्हणून प्रशंसनीय ट्रॅक रेकॉर्ड आहे, त्यांनी झुरिक, स्वित्झर्लंड येथून फिफा स्पोर्टस् मेडिसीन, सिंगापूर येथून स्पोर्ट मेडिसीनमध्ये पी एचडी, फिनलंड येथून फेलोशीप पोडियाट्रिक्सचे शिक्षण घेतले आहे.
कतार येथे मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. सध्या ते बारामती व फलटण येथे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत व अनेक खेळाडूंना वैद्यकीय मार्गदर्शन व सेवा पुरवतात
No comments:
Post a Comment