देसाई इस्टेट मध्ये युवराज गजाकस यांच्या वतीने शालेय वस्तूचे वाटप...
बारामती :- नगरसेवक अतुल बालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली देसाई इस्टेट मधील युवकांनी आत्तापर्यंत केलेले कार्य उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जय पाटील यांनी केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शाखा अध्यक्ष युवराज गजाकस यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी जय पाटील बोलत होते. यावेळी युवक चे अध्यक्ष अविनाश बांदल, माजी पंचायत समिती गटनेते दीपक मलगुंडे, स्थानिक नगरसेवक अतुल बालगुडे, सोशल मीडिया अध्यक्ष तुषार लोखंडे, शहर राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष संग्राम खंडागळे, व उद्योजक अमोल पवार,प्रसिद्ध व्याख्याते अनिल सावळेपाटील, देसाई इस्टेट मधील राजे प्रतिष्ठान व श्री गणेश तरुण मंडळ चे सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तित होते.
कोरोना काळात सुद्धा युवकांनी उल्लेखनीय कार्य युवकांनी केल्याचे नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले. शरद पवार साहेबाना वाढदिवसानिमित्त युवराज गजाकस यांनी शुभेच्छा दिल्या व उपस्थितांचे स्वागत केले.आभार अमोल पवार यांनी मानले.
No comments:
Post a Comment