'राज्य उत्पादन शुल्क'तर्फे हॉटेल,धाब्यांवर कारवाई कधी? दारू सप्लाय मालकावर कारवाई होईल का?
बारामती:- हॉटेल तथा ढाब्यांवर बसून विनापरवाना दारू पिणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र कधी सुरू करणार आहे?घरगुती,बियर शॉपी,हॉटेल,ढाब्यांवर छापे टाकून चालकांसह ही दारू सप्लाय करणाऱ्या मूळ मालकावर कारवाई करणार का?त्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या मद्यपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हे दाखल करावे,किरकोळ कारवाई केल्याची दाखवली जाते परंतु बारामती- एम.आय. डी. सी.- भिगवण,पुणे-बारामती ते बारामती-इंदापूर
मार्गावरील हॉटेल,ढाब्यावर छापा टाकून चालक याच्यासह त्यांना दारू पुरविणाऱ्याला अटक केली पाहिजे.कुठेही विनापरवाना दारू विक्री होत असेल तर कारवाई होणे गरजेचे आहे पण त्याच बरोबर त्यांना माल पुरविणाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी महिला भगिनी करताना दिसत आहे. खासकरून बारामती तालुक्यात निरा,जेजुरी, बारामती, उंडवडी याभागातून ही अवैध दारू सप्लाय होत असल्याचे सांगूनही कारवाई का होत नाही ही एक चिंतेची बाब आहे त्यामुळे तक्रारी करूनही कारवाई होतच नसेल तर तक्रारी करण्याला काय अर्थ अश्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असल्याचं कळतंय.
No comments:
Post a Comment