घरमालकांनी स्वतःची घरे,मालमत्ता भाड्याने देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक... बारामती:- मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी संपूर्ण पुणे जिल्हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय, किंवा इतर जिल्ह्यातून आलेले नागरिक नोकरी,व्यवसाय व इतर कामानिमित्त घेऊन भाड्याने घरे दुकाने फ्लॅट घेऊन राहत आहेत परंतु त्याचे बाबतची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला देण्यात येत नाही व त्यामधून दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी पार्श्वभूमीवर गुन्हा घडल्यानंतर त्याची तात्काळ उकल होण्यासाठी घरमालकांनी स्वतःची घरे,मालमत्ता भाड्याने देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती घेऊन ती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक ठरते जेणेकरून दहशतवादी किंवा गुन्हेगारी कारवाया आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल त्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी पुणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यासंदर्भात त्यांचे कडील जा.क्र -पगक/कावि/६६७३/२०२२ दिनांक - २६/१२/२०२२ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेला असून संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नगरपंचायत, ग्रामपंचायत हद्दीतील घरमालक, मालमत्ताधारक व इतर सर्व आस्थापना मालक यांनी त्यांचेकडील घरे,दुकाने, फ्लॅट तसेच फार्म हाऊस या ठिकाणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाडेतत्त्वावर देणे किंवा पोटभाडेकरू ठेवणे किंवा मालमत्तेची विक्री केल्यास विकत घेणाऱ्यांची व भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिस स्टेशन ला ७ दिवसाच्या आत कळवणे बाबत प्रतिबंध आदेश जारी केलेला आहे.
तरी माळेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या माळेगाव नगरपंचायत व सर्व ग्रामपंचायत हद्दीत ज्या मालमत्ताधारकांनी आपली घरे,फ्लॅट,इमारत,किंवा हॉस्टेल, गाळे इतरांना भाडेतत्त्वावर दिलेले आहेत अशा सर्व भाडेकरूंची तसेच हॉटेल, ढाबा, चायनीज सेंटर, सलून, बांधकाम क्षेत्र किंवा इतर सर्व व्यवसाय मधील सर्व कामगार, तसेच शेतीच्या कामासाठी ठेवलेले मूळ गाव सोडून दुसरे गावात आलेले सर्व नागरिक, विद्यार्थी, परजिल्ह्यातील किंवा परप्रांतीय अशा नागरिकांची भाडेकरू म्हणून माहिती घरमालकांनी आस्थापना मालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरू व त्यांच्या सोबतच्या कुटुंबातील सदस्य यांचे संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मुळगावचा पत्ता, २ फोटो त्यांना ओळखणाऱ्या मूळ गावचे २ प्रतिष्ठित व्यक्तींचे पूर्ण नाव, पद संपर्क क्रमांक व पत्ता घरभाडे करारनामा तसेच त्यांचे ओळखपत्र इ. कागदपत्रे प्राप्त करून घेऊन संबंधित माहिती भाडेकरूंना मालमत्ता भाड्याने दिलेपासून ७ दिवसाच्या आत पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक आहे,तरी सदरची माहिती माळेगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक श्री.ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग यांचे सादर करावी.
*ज्या घरमालक,मालमत्ताधारक,आस्थापना मालक यांनी आपले घर,फ्लॅट,इमारत भाड्याने दिलेले आहेत किंवा कामगार कामासाठी ठेवलेले आहेत त्यांची माहिती दिनांक ०५/०१/२०२३ रोजी पर्यंत सादर न केलेस संबंधित घरमालक, मालमत्ताधारक,आस्थापना मालक यांचेवर प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई येणार असले बाबतची माहिती माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.किरण अवचर यांनी दिलेली आहे.*
No comments:
Post a Comment