पत्नीने पतीचा दगडाने ठेचून व विळयाने वार करुन खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 5, 2022

पत्नीने पतीचा दगडाने ठेचून व विळयाने वार करुन खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा...

पत्नीने पतीचा दगडाने ठेचून व विळयाने वार करुन खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा...
बारामती:- दिनांक ०५/१२/२०२२ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश जे. ए. शेख
साो. यांनी साळोबाची वस्ती, खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे येथील शोभा अनिल इंगळे हीने
पतीचा दगडाने ठेचून व विळयाने वार करुन खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची व पाच हजार
रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाची साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक २३/०८/२०१५ रोजी आरोपी नामे
शोभा अनिल इंगळे हीने पती नामे अनिल संतोष इंगळे हयाच्याशी घरामध्ये दोघांचे पटत
नसले कारणावरुन सतत भांडणे होत होती. त्यामुळे दिनांक २३/०८/२०१५ रोजी रात्री
त्या कारणावरुन आरोपी शोभा इंगळे हीने पती अनिल संतोष इंगळे याच्या डोक्यात दगड घालून व विळयाने वार करुन पतीचा खून केला.दि.२३/०८/२०१५ रोजी यवत पोलीस स्टेशन मध्ये सरकारी पक्षातर्फे सुनिल संतोष इंगळे
यांनी सदर आरोपी विरुध्द फिर्याद दिली होती. सदरील गुन्हयाचा तपास तात्कालीन
अधिकारी आर. के. गवळी यांनी तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासले. सदर खटल्या कामी
साक्षीदार व तपासी अधिकारी यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. सदरील केसमध्ये सरकार
पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी कामकाज पाहिले. केसमध्ये
फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे जबाब व सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी
केलेला युक्तीवाद व पुरावा ग्राहय धरुन मे. न्यायालयाने भा.द.वि. कलम ३०२ अन्वये
वरीलप्रमाणे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५
दिवसाची साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
सदर प्रकरणी यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी मदने यांनी केस अधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे.
तसेच त्यास पोलीस नाईक वेणूनाद ढोपरे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच एन. ए.
नलवडे सहा. पोलीस उपनिरीक्षक यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

No comments:

Post a Comment