बारामतीत समस्त बहुजन समाजाच्या वतीने महापुरुषांच्या सन्मानासाठी जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन….
,
बारामती :- अखंड भारताचे श्रध्दास्थान छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊ पाटील यांच्या विषयी भारतीय जनता पार्टी व आर एस एस चे नेते चंद्रकांत पाटील, भगत सिंग कोशारी, सुधांशू त्रिवेदी, राम कदम या लोकांकडून वारंवार अवमान जनक वक्तव्य करण्यात आली होती त्यांच्या निषेधार्थ आज बारामती शहरामध्ये समस्त बहुजन समाजाच्या
वतीने जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा बारामती येथील सिध्दार्थ नगर बौध्द विहार येथून शहराच्या दिशेने काढून बारामती नगर परिषदे समोर निषेध सभा पार पडली या मोर्च्यामध्ये हजारोच्या संख्ये बहूजन समाजातील महीला व नेते मान्यवर उपस्थीत होते व बारामतीतील व्यापारी महासंघने या मोर्चास पाठींबा देवून बारामती बंदची हाक दिली होती त्यास बारामतीकरांच्या वतीने उत्फुर्त असा प्रतिसाद देवून आपली दुकाने बंद ठेवली होती. या मोर्चाच्या निषेध सभेची सुरूवात समता सैनिक दलाकडून त्रिसरन पंचशील घेवून करण्यात आली या मध्ये मुस्लीम समाजाच्या वतीने सोहेल शेख,समता परिषदेचे श्री. घुले, कोलाटी समाजाच्या वतीने अभिजीत काळे, मातंग समाजाच्या वतीने साधू बल्लाळ, मराठा समाजाच्या वतीने योगेश जगताप, लोहार समाजाच्या वतीने मच्छिंद्र टिंगरे, संभाजी
बिग्रेट च्या वतीने विनोद जगताप वंचीत बहूजन आघाडीच्या वतीने राज कुमार यांनी भारतीय जनता पार्टी व आर एस एस चे नेते चंद्रकांत पाटील, भगत सिंग कोशारी, सुधांशू त्रिवेदी, राम कदम च्या बेताल वक्तव्याचा निषेध केला. ए आय एम आय एम व राष्ट्रवादीचे जय पाटील यांच्या वतीने सदर मोर्चास पाठींबा देण्यात आला. सदरच्या मोर्चाचे आयोजन बसपाचे काळूराम चौधरी, मा. नगरसेवक गणेश सोनवणे, वंचितचे मा. जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे, मा. नगरसेवक अभिजीत चव्हाण, मा.उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते बबलू जगताप, सिध्दार्थ सोनवणे, लोकशाही
प्रतिष्ठानचे अनिकेत मोहिते, गौतम शिंदे, शुभम अहिवळे, विकास जगताप, सिध्दांत सावंत, भास्कर दामोदरे, रोहित भोसले, कृष्णा क्षीरसागर, आरती ताई शेंडगे यांनी केले होते यामध्ये आयोजकांच्या वतीने राज्यपाल भगत सिंग कोशारी यांची राज्यपाल पदावरून हकलपट्टी करण्यात यावी व चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच शाईफेक प्रकरणातील मनोज गरबडे या भिमसैनिकावरी ३०७, ३५३ सारखे खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली,
शाई फेक प्रकरणामधील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली तसेच लोकमतचे पत्रकार वाकडे यांच्या बेकायदेशीर अटकेचा निषेध करण्यात आला. तसेच आयोजकांच्या वतीने देखील निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चामध्ये माजी उपनगरध्यक्ष भारत दादा अहिवळे, राष्ट्रवादीचे ता. अध्यक्ष संभाजी होळकर, मा. नगरसेवक सुधीर नाना सोनवणे, किशोर सोनवणे, नितीन शेलार, निलेश मोरे, दिपक भोसले, रोहन मागाडे, संतोष काकडे, राहूल कांबळे,सिध्दार्थ शिंदे, सिताराम कांबळे, आप्पा अहिवळे, सुशिल अहिवळे, अजित कांबळे, स्वप्निल जगताप,
अॅड. अमोल सोनवणे, मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे हे देखील उपस्थीत होते सभेची सांगता मा.
नगराध्यक्ष कैलास चव्हाण यांनी केली व प्रशासनास अनेक मागण्याचे निवेदन दिले व मनोज गरबडे यांच्या न्यायलयीन लढयासाठी बारामती शहरातील भिमसैनिक निधी गोळाकरून समता सैनिक दलाचे पुण्यशिल लोंढे, किरण भोसले, अमोल वाघमोरे यांच्याकडे सुपूत करणार आहेत.
No comments:
Post a Comment