*वंचित बहुजन आघाडी बारामती शहर व तालुका कार्यकारणी मुलाखती संपन्न*
बारामती:- आज रोजी वंचित बहुजन आघाडीच्या बारामती शहर व तालुका माळेगाव नगरपंचायत बांधणीसाठी कार्यकर्त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम घेण्यात आला होता यामध्ये विविध जाती धर्मातील लोकांनी सहभाग घेऊन मुलाखती दिल्या आहेत व वंचित बहुजन आघाडी मजबूत करण्यासाठी प्रेयत्न शील असल्याचे पहायला मिळाले जिल्हा अध्यक्ष राज कुमार यांनी वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्यात मोठ्या ताकतीने वाढवणार व कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे सांगितले या दरम्यान जिल्हा संपर्क प्रमुख ऍड वैभव कांबळे, जिल्हा सहसचिव गोविंद कांबळे, जिल्हा संघटक सुजय रणदिवे, जिल्हा सचिव ऍड बाबाजान शेख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये शिरष्णेचे विद्यमान उपसरपंच ज्योतिबा खरात यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश केला कार्यक्रमाचे नियोजन मा. पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी करुन सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment