संतापजनक..१६ वर्षीय तरुणान क्रूर कृत्य विकृतीचा कळसच गाठला! गाईचे पाय बांधून केला अनैसर्गिक अत्याचार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 14, 2022

संतापजनक..१६ वर्षीय तरुणान क्रूर कृत्य विकृतीचा कळसच गाठला! गाईचे पाय बांधून केला अनैसर्गिक अत्याचार...

संतापजनक..१६ वर्षीय तरुणान क्रूर कृत्य विकृतीचा कळसच गाठला! गाईचे पाय बांधून केला अनैसर्गिक अत्याचार...                                    पुणे:-विकृती कोणत्या थराला जातेय याचा किळसवाणा प्रकार घडला, पुणे शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील हडपसर परिसर एका १६ वर्षीय मुलाने मोकळ्या जागेत बांधलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.ही संतापजक घटना १३ डिसेंबरला घडली आहे.याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे,मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती हे पुण्यातील फुरसुंगी येथील परिसरात राहतात. १३ डिसेंबरला घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची जर्सी जातीची गाय बांधली होती. सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास १६ वर्षीय मुलगा त्याठिकाणी आला. त्याने गायीचे हातपाय बांधून तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. दरम्यान, हा प्रकार तक्रारदाराच्या लक्षात येताच, त्यांनी पोलीस स्टेशन गाठत संबंधित मुलाविरोधात तक्रार दिली. तक्रार प्राप्त होताच हडपसर पोलिसांनी १६ वर्षीय मुलावर भादवी कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलं आहे.गाईवर १६ वर्षीय मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment