जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय बारामती येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात संपन्न...
बारामती:- आज दिनांक 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय बारामती येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाचे नियोजन श्री. सतीश फाळके भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.त्यासमयी श्री. सतीश फाळके यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या व भारतामधील महाराष्ट्र या राज्यानेच प्रथमतः दिव्यांग मंत्रालय स्थापन करून फक्त देशासाठीच नाही तर संपूर्ण जगाला आदर्श घालून दिल्या बद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले, तसेच उपस्थितांना त्यांच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबद्ध असल्याबाबत सांगितले, त्याप्रसंगी उपस्थित दिव्यांगाना मिठाई व कडाक्याच्या थंडी पासून बचावं करण्यासाठी ब्लॅंकेट वाटप भारतीय जनता पार्टी बारामती शहर यांचे वतीने करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेश कांबळे यांनी केले, स्वागतपर भाषण श्री शहाजी कदम यांनी केले तसेच उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टी शहर दिव्यांग सेल चे अध्यक्ष श्री. संग्राम जाधव, श्री.राजेश कांबळे, श्री. शहाजी कदम, श्री.प्रमोद डिंबळे, श्री. अक्षय गायकवाड,श्री गवळी तसेच विविध दिव्यांग समितीचे पुढीलप्रमाणे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते श्री.कैलास शिंदे श्री.दत्ता शिंदे श्री.नामदेव चांदगुडे श्री.मधुकर वायकर श्री.गारडी काका श्री.दीपक गायकवाड श्री.विनोद खरात इ. उपस्थित होते
No comments:
Post a Comment