*डॉ. मिलिंद कांबळे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार*
बारामती:- ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव पुणे येथे सकाळी अकरा वाजता संपन्न झाला. डॉ. मिलिंद कांबळे हे विद्या प्रतिष्ठानचे कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विद्यानगरी बारामती येथे गेली 26 वर्ष कनिष्ठ विभागात हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन संस्थेने समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मा. ई. झेड. खोब्रागडे आय.ए.एस अधिकारी, प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते माननीय आनंद जोग व उद्घाटक माननीय डॉक्टर बबन जोगदंड यशदा संशोधन अधिकारी पुणे तसेच ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष माननीय कैलास बनसोडे व सकाळ समूहाचे पत्रकार माननीय संदीप काळे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील विविध क्षेत्रा मधील जवळपास 100 मान्यवरांचा सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, उद्योग क्षेत्रातील, आदींना वैद्यकीयरत्न, शिक्षकरत्न, समाजरत्न. उद्योगरत्न व क्रीडारत्न पुरस्कार देऊन त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिका वाचून करण्यात आली. सिने अभिनेते अनंत जोक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम अतिशय सुंदर संपन्न झाला.
No comments:
Post a Comment