धक्कादायक..तृतीयपंथीला मारहाण करत तिघांनी केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 24, 2022

धक्कादायक..तृतीयपंथीला मारहाण करत तिघांनी केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार...

धक्कादायक..तृतीयपंथीला मारहाण करत तिघांनी केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार... मुंबई :-किळसवाणा विकृतीची किती तरी प्रकरण बाहेर येत आहेत,माणूस किती वाईट वागत आहे याचे उदाहरण पुढे येत आहे,नुकताच एक घटना घडली, तृतीयपंथीवर तिघांकडून लैंगिक
अत्याचार, मदतीला धावणाऱ्यावरही हल्ला करण्यात आला मित्राला भेटायला गेलेल्या 26 वर्षीय तृतीयपंथीला तिघांनी मारहाण करत अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगर परिसरात घडली.पीडित तृतीयपंथीला मदत करायला पुढे सरसावलेल्या तृतीय पंथीवरही धारदार शस्त्राने हल्ला  करण्यात आला.याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी फैजान सिद्दिकी (27) याला अटक केली आहे. गोवंडी परिसरात तक्रारदार तृतीयपंथी रात्री एक वाजताच्या सुमारास त्याच्या रफिक नगरमध्ये राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी जात असताना फैजानसह त्याच्यातून साथीदारांनी त्यांची वाट रोखली आणि माराहाण केली. तसेच त्यांचे कपडे फाडून त्यांच्यावर अनैसर्गिक
अत्याचार केले. पीडित तृतीयपंथीला मदत करायला पुढे
सरसावलेल्या तृतीय पंथीवरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, या घटनेची माहिती मिळताच
शिवाजीनगर पोलिस आणि घटनास्थळी धाव घेतली.
दोन्ही तृतीयपंथींना उपचारांसाठी जवळच्या
रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी
पोलिसांकडून फैजानच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू
आहे.

No comments:

Post a Comment