बी.ए.के.ए.पी इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये
आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस जल्लोषात साजरा...
बारामती:- भारतरत्र अबुल कलाम आझाद प्रतिष्ठानचे बी.ए. के.ए.पी इंग्लिश
मिडिअम स्कूल जळोची, बारामती येथे पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या
वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्याच्या विविध खेळाच्या स्पर्धा, शैक्षणिक प्राविण्य स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी या माध्यमातून आदरणीय साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी विद्यालयातील ४गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली विशेष आरोग्य
सेवा मोफत देण्याची डॉ. सौरभ मुथा यांनी घोषणा केली. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जय पाटील,मा. नगरसेवक बालगुडे , माजी सभापती दीपक मलगुंडे, गणेश
शिंदे मा. चेअरमन खादी महामंडळ व अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment