डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी तमाम अनुयायांकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन .. बारामती:- शहरात काल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी तमाम अनुयायांकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले संविधान युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सिद्धांत सावंत यांनी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या जनतेस आव्हान केले होते की हार फुलांचा खर्च टाळून एक वही एक पेन दान करा त्यास उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला त्याच अनुषंगाने काल आमराई तालीम च्या कार्यकर्त्यांनी स्पर्धा परीक्षेचा सराव करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके भेट दिली त्यावेळी माझी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम थोरात,काँग्रेस पार्टीचे रोहित बनकर व भा.ज.पा चे कार्यालयमंत्री-रघुजी चौधर इतर मान्यवर उपस्थित होते.पुस्तके भेट देण्याची संकल्पना अक्षय शेलार व मयूर कांबळे यांची होती.
Post Top Ad
Wednesday, December 7, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी तमाम अनुयायांकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन ..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी तमाम अनुयायांकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन ..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment