वालचंदनगर हद्दीतील पीडित महिलेच्या पोटात चाकु खुपसून जखमी करणाऱ्यास अटक.. वालचंदनगर:- वालचंदनगर पोलीस स्टेशन दि.30/11/2022 रोजी दुपारी 01/00 वा.चे सुमारास यातील निर्भया
व तिची मामी (अ.ब.क) असे किराणा सामान घेवुन पायी घरी येत असताना यातील आरोपी नामे- रोहित हणुमंत चतुर,वय 25-वर्षे, रा. आनंदनगर, ता. इंदापुर जि.पुणे याने फिर्यादीचा पाठलाग करुन यातील पिडीता अ.ब.क हिने गिफ्ट व रक्कम न घेतलेचा राग मनात धरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने चाकुने फिर्यादीचे पोटात डावे बाजुस खुपसुन तीस गंभीर जखमी
केले बाबत वालचंदनगर पोलीस स्टेशन गु.र.नं-533/2022 भादवि कलम - 307,354(ड),354,बाल लैगिक अत्याचार
अधिनियम 2012 चे कलम 9,10, शस्त्र अधिनियम 4,25, मुंबई पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास विजय हरी टेळकीकर, पोलीस उपनिरीक्षक वालचंदनगर पोलीस स्टेशन हे करीत होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन मा. आनंद भोईटे, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग बारामती. मा.गणेश इंगळे ,उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग बारामती, यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीस तत्काळ अटक करुन त्याचेवर कायदेशीर कार्यवाही व्हावी याकरीता वालचंदनगर पोलीस स्टेशन, भिगवण पोलीस स्टेशन, स्था. गुन्हे शाखा पुणे
ग्रामीण यांची 6 तपास पथके तयार करुन मा.विक्रम ना.साळुंखे सो, सहा. पोलीस निरीक्षक वालचंदनगर पोलीस स्टेशन,मा.अतुल खंदारे पोलीस उपनिरीक्षक, मिलींद मिठ्ठापल्ली पोलीस उपनिरीक्षक, विजय हरी टेळकीकर, पोलीस उपनिरीक्षक वालचंदनगर पोलीस स्टेशन, शिदे पाटील पोलीस उपनिरीक्षक स्था. गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे नियंत्रणाखालील पोलीस
पथकास मार्गदर्शन केले यातील आरोपीचा शोध घेणेकामी कसोशिने प्रयत्न चालु केला यातील पाहिजे आरोपीचा शोध घेणेकामी हद्दितील तांत्रीक पध्दतीने तसेच गुप्त बातमीदार मार्फत तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे अधिक माहिती मिळवुन अत्यंत चिकाटीने सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे-रोहित हणुमंत चतुर, वय 25-वर्षे, यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा.अंकित गोयल , पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. आनंद भोईटे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग बारामती. मा.गणेश इंगळे सो उपविभागीय पोलीस अधीकारी बारामती विभाग बारामती यांचे
मार्गदर्शनाखाली मा.विक्रम ना.साळुंखे सहा.पोलीस निरीक्षक वालचंदनगर पोलीस स्टेशन मिलींद मिठ्ठापल्ली पोलीस
उपनिरीक्षक,सहा.फौजदार शिवाजी निकम, पो.हवा. उत्तम खाडे ब.नं-234, म.पो.ना. मोनिका मोहिते ब.नं-2380,
पोलीस अमलदार प्रमोद भोसले ब.नं-1447 यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास विजय हरी टेळकीकर पोलीस उपनिरीक्षक
वालचंदनगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment