बारामतीत पहिल्यांदाच तालुका सहकारी ग्रामोद्योग संस्थेची या तीन पक्षामुळे झाली निवडणूक बिनविरोध...
बारामती:- बारामतीतील एका सहकारी संस्थेत तीन पक्ष एकत्र आले आहेत. बारामती तालुका सहकारी ग्रामोद्योग संघाची निवडणूक आज बिनविरोध झाली. यामध्ये तीनही पक्षाचे कार्यकर्ते संचालक म्हणून निवडले गेले आहेत.
बारामती तालुक्यातील सहकारी ग्रामोद्योग
संघाच्या निवडणूकीत तीनही पक्षांची दिलजमाई
झाली. या संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप व मनसे या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र बसून ही निवडणूक बिनविरोध केली.बारामती तालुका सहकारी ग्रामोद्योग संस्थेची निवडणूक गेली अनेक वर्षांपासून बिनविरोध होत आहे. तालुक्यातील सर्वच सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असल्याने ग्रामोद्योग संस्थेच्या संचालक मंडळावर देखील राष्ट्रवादीच्या विचारसरणीचे कार्यकर्ते निवडून जात होते.यंदा पहिल्यांदाच भाजपने यात प्रवेश केला आहे.या निवडणुकीत सर्व जागांवर भाजपने उमेदवार उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील सर्व जागांवर आपले उमेदवार निश्चित केले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ६, भाजपला ४ व मनसेला १ जागा देण्याचे निश्चित झाले आणि ही निवडणूक बिनविरोध पार पडली. राज्यात या तीनही पक्षांमध्ये जोरदार सत्ता संघर्ष सुरू असताना बारामतीतच भाजप आणि राष्ट्रवादीचे मनोमिलन झाल्याचे चित्र पहावयास मिळाले असून आपापल्या परीने आनंद साजरा केला.
No comments:
Post a Comment