औरंगाबाद येथे महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागम स्वेच्छा सेवांचा शुभारंभ* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 25, 2022

औरंगाबाद येथे महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागम स्वेच्छा सेवांचा शुभारंभ*

*औरंगाबाद येथे महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागम स्वेच्छा सेवांचा शुभारंभ*

    बारामती (प्रतिनिधी) :- महाराष्ट्राच्या 56व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात दिनांक 27, 28 व 29 जानेवारी, 2023 रोजी औरंगाबाद येथील बिडकीन दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर येथे होणार आहे. या समागमाच्या पूर्वतयारीसाठी स्वेच्छा सेवांचा शुभारंभ रविवार, दिनांक 25 डिसेंबर रोजी झाला असून त्याचे विधिवत उद्घाटन परम् आदरणीय श्री.मोहन छाब्रा मेंबर इंचार्ज, ब्रांच प्रशासन, संत निरंकारी मंडळ, यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
   या उदघाटन समारोहमध्ये बारामतीसह आजुबाजुच्या परिसरातून तसेच महाराष्ट्राच्या अन्य ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादल महिला व पुरुष स्वयंसेवक आणि अन्य भक्तगण या उद्घाटन समारोहामध्ये सहभागी झाले होते. 
    या उद्घाटन समारोहाची सुरवात सद्गुरु माता जी व निरंकार प्रभुचरणी हा समागम यशस्वीरित्या पार पडावा या हेतुने प्रार्थना व नमन या रुपात करण्यात आला. या सोहळ्यामध्ये दिल्लीहून संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इंचार्ज श्री जोगिंदर मनचंदाजी यांच्यासह समागम समितीचे चेअरमन, समन्वयक, अन्य सदस्य तसेच 
   उद्घाटन प्रसंगी आपले शुभभाव व्यक्त करताना पूज्य श्री. मोहन छाब्राजी म्हणाले, की संत निरंकारी मिशन हे सत्य, प्रेम, शांती, मानवता आणि विश्वबंधुत्वाचे मिशन आहे. मिशनचा हा दिव्य संदेश प्रसारित करुन मानवाला मानवाशी जोडण्याचे कार्य या संत समागमाच्या माध्यमातून केले जाणार आहे. पुरातन काळापासून संत, गुरु-पीर-पैगंबरांनी जो आध्यात्मिकता व मानवतेचा संदेश जगाला दिला तोच संदेश आज वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज विश्वभर देत आहेत. या संत समागमाचाही हाच मुख्य उद्देश आहे.
  उल्लेखनीय आहे, की यापूर्वी महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमांची श्रृंखला सन 2019 पर्यंत मुंबई महानगर परिक्षेत्रातच आयोजित होत आली. जानेवारी, 2020 मध्ये 53वा समागम प्रथमच मुंबईबाहेर नाशिकमध्ये आयोजित केला गेला आणि त्यानंतर दोन वर्षे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 2 संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात आले जे समस्त भक्तगणांनी प्रभू इच्छा समजून गोड मानून घेतले आणि घरबसल्याच त्या समागमांचा आनंद प्राप्त केला. आनंदाची हीच दिव्य अनुभूती पुनश्च जागृत करण्याच्या हेतुने यावर्षी 56वा वार्षिक निरंकारी संत समागम भव्य-दिव्य रुपात औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात येत आहे ज्याचे संपूर्ण निरंकारी जगत साक्षी होईल.

No comments:

Post a Comment