संतापजनक..मूक-बधीर तरुणीला रस्त्यावर तिघांनी अडवून एकाने केला अत्याचार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 7, 2022

संतापजनक..मूक-बधीर तरुणीला रस्त्यावर तिघांनी अडवून एकाने केला अत्याचार...

संतापजनक..मूक-बधीर तरुणीला रस्त्यावर तिघांनी अडवून एकाने केला अत्याचार... 
चाळीसगाव:- महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशातच चाळीसगाव तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आलीय. रस्त्याने पायी जात असलेल्या एक
मूक-बधीर तरुणीला तिघांनी मारहाण करत
तिच्यावर एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक
घटना घडलीय. याबाबत मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमांचा शोध सुरू झाला आहे,मिळालेली माहितीनुसार चाळीसगाव तालुक्यात असलेल्या एका गावात
एक २५ वर्षीय मूक बधीर तरुणी रस्त्याने जात
असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी तिला
अडविले. दोघांनी तिला ओढाताण करीत डोळ्यावर मारहाण केली. तर एकाने तिच्यावर अत्याचार केला.याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख करीत आहेत.दरम्यान, घटनेची माहिती समोर आल्यावर पीडितेला उपचारार्थ धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष शिक्षिकेसमोर इशाऱ्याने तिने सर्व प्रकार सांगितला. तसेच आरोपी समोर आल्यास त्यांना ओळखेल असे तिने सांगितले आहे.अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment