माधव जोशी सर यांना "काव्य शिल्प पुरस्कार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 23, 2022

माधव जोशी सर यांना "काव्य शिल्प पुरस्कार...

माधव जोशी सर यांना "काव्य शिल्प पुरस्कार...

बारामती :- बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. माधव वामनराव जोशी सर यांना पुणे येथील "काव्य शिल्प" या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये" काव्यशिल्प पुरस्कार 2022" देऊन त्यांना सन्माि करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा काव्य मित्र पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी काव्यशिल्पचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी सर, सचिव सुजाता पवार, महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्नेहसंमेलनाच्या मेळाव्याच्या निमित्ताने सकाळच्या सत्रात अरूण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. दुपारच्या सत्रात विविध कवींच्या कवितांवर आधारित अभिवाचन कार्यक्रम सभासद कवींनी सादर केले. यावेळी काव्यशिल्पाच्या निवडक जुन्या सभासदांपैकी दीपक करंदीकर, मनोहर सोनवणे, जयंत भिडे, गुरुजन घाणेकर, कीर्ती मराठे, यांचाही सत्कार करण्यात आला. बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी सर तथा एम डब्ल्यू जोशी सर यांना काव्य मित्र पुरस्कार 2022 मिळाल्याने सर्व क्षेत्रात विशेषता साहित्य क्षेत्रात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

No comments:

Post a Comment