*जातीद्वेषाच्या राजकीय करामतीचे सुत्रधार हे बारामतीचे शरद पवारच आहेत - शिवानंद हैबतपूरे* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 12, 2022

*जातीद्वेषाच्या राजकीय करामतीचे सुत्रधार हे बारामतीचे शरद पवारच आहेत - शिवानंद हैबतपूरे*

*जातीद्वेषाच्या राजकीय करामतीचे सुत्रधार हे बारामतीचे शरद पवारच आहेत - शिवानंद हैबतपूरे*

बारामती दि.१३/१२/२०२२:- बारामती शहर भाजपाच्या कार्यालयावरील फलकाला काळं फासणारे हे नेमके कोणाचे बगलबच्चे आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. जातीद्वेषाच्या राजकारणाची बिजं ही शरद पवारांनीच पेरली असुन आज राज्यातील वातावरण दुषित करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपूरे यांनी बारामती येथे केला. बारामती शहर भाजपा कार्यालयावर काळे फासल्याची घटना घडल्या नंतर शिवानंद हैबतपूरे यांनी बारामती येथिल कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपूरे म्हणाले की भाजपा नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या वक्तव्याचा विपर्यास जाणिवपूर्वक केला गेला. अगदी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर ही दादा पाटलांवर शाईफेक करण्यात आली. तत्पूर्वी बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व सोमेश्वर सहकारी साखर कारखाण्याचा संचालक ऋषीकेश गायकवाड याने चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर काळं फासणार्याला  एक्कावण्ण हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.  राजकारणात या तालिबाणी फतव्यांना घोषित करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा हीच चंद्रकांत दादा पाटील यांच्या वरील हल्ल्याला कारणीभूत ठरली आणि आज  नेमकं बारामती शहर भाजपा कार्यालयाच्या फलकावर  काळं फासले गेले.  वास्तविक बारामती शहर भाजपा कार्यावयावरील फलकाला काळं फासलं नसून हे संविधानावर व लोकशाही प्रकियेवर काळे फासले गेले असल्याचे मत भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपूरे यांनी व्यक्त केले. 
बारामती शहर भाजपा कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत या प्रसंगी उपस्थित पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गोविंद देवकाते, भाजपा शहराध्यक्ष सतीश फाळके, यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर, प्रदेश अनुसूचित मोर्चा सदस्य सचिन साबळे, बाळासाहेब शिवसेनेचे नेते देवेंद्र बनकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम थोरात, सुहास टकले आदि मान्यवर उपस्थित होते..

No comments:

Post a Comment