पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाराला 10 हजार रुपये लाच घेताना अॅन्टी करप्शनची कारवाई..
पुणे :- लाच घेणाऱ्या मध्ये वाढ होत असताना कारवाई देखील वाढल्या असल्याने अनेक प्रकरणे पुढे आली आहे, नुकताच कारवाई न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी
10 हजार रुपये लाच स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील वालचंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.मोहन मल्हारी ठोंबरे असे लाच घेताना पकडण्यात
आलेल्या पोलिसाचे नाव आहे. पुणे एसीबीने ही कारवाई शुक्रवारी (दि. 27 )वालचंदनगर पोलीस ठाण्यात केली. याबाबत 34 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे शुक्रवारी तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्याविरुद्ध वालचंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे. दाखल तक्रारीमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार मोहन ठोंबरे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. पुणे युनिटने पंचासमक्ष पडताळणी केली असता मोहन ठोंबरे यांनी प्रतिबंधात्मक कारवाई न
करण्यासाठी व मदत करण्यासाठी तक्रारदार
यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.पथकाने वालचंदनगर पोलीस ठाण्यात सापळा रचला.तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना मोहन
ठोंबरे यांना रंगेहात पकडण्यात आले.
ठोंबरे यांच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करत आहेत.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment