गुन्हेगारीने पुन्हा एकदा काढले डोकं;हुल्लडबाजांकडून 20 वाहनांची तोडफोड,आरोपीची पोलिसांना धक्काबुक्की.. पिंपरी चिंचवड:- पुणे व पिंपरी चिंचवड व आज7बाजूबाजूच्या परिसरात सद्या गुन्हेगारी वाढत असून पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले असतानाच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी-
चिंचवडमध्ये गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं चित्र आहे सर्वत्र नूतन वर्षाचे स्वागत होत असताना पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी आणि वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत
हुल्लडबाजांकडून राहटणी आणि पिंपळे
सौदागर परिसरात मध्यरात्री तब्बल 20 हून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात
आली आहे. हुल्लडबाजांकडून कोयते आणि सिमेंटच्या गट्टूनी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. शनिवारी 31 डिसेंबर रोजी रात्री सर्वजण सरत्या वर्षाला निरोप देतात आणि नूतन वर्षाचे स्वागत करतात. त्यासाठी ठिकठिकाणी विध कार्यक्रमांचे तसेच पाटर्यांचे आयोजन केले जाते. कुठेही अनुचित घटना, प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी संपुर्ण शहरात कडेकोठ बंदोबस्त तैनात केला जातो. सालाबादाप्रमाणे
यंदाही पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त होता. मात्र,रिक्षातून आलेल्या 4 ते 5 हुल्लडबाजांकडून तब्बल 20 हून अधिक दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. वाकड पोलिसांनी हुल्लडबाजांच्या मुसक्या
आवळण्याचा अटोकाट प्रयत्न केला मात्र डांगडिंग करणाऱ्या हुल्लडबाजांनी पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून पळ काढला आहे. दरम्यान,पोलिस अधिकारी व कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रीकरणावरून संबंधित समाजकंटकांचा शोध घेत आहेत. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. अशा प्रकारच्या समाजकंटकांच्या मुसक्या आवळयाचे
मोठे आव्हानच आता पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर उभे राहिले आहे.पिंपरी-चिंचवड शहरात इतरत्र किरकोळ घटना सोडल्या तर सर्वच ठिकाणी नव वर्षाचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले आहे.
घडलेल्या वाहनांच्या तोडफोडीबाबत वेगवेगळ्या
पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अधिकचा तपास पोलिस करीत आहेत.
No comments:
Post a Comment