महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे बारामती येथे 260 व्या महिलेची जटेतुन मुक्तता...... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 20, 2023

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे बारामती येथे 260 व्या महिलेची जटेतुन मुक्तता......

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे बारामती येथे 260 व्या महिलेची जटेतुन मुक्तता......
  
बारामती:- सौ.करूणा किर्तीकर (वय 43वर्षे)रा. बारामती यांच्या डोक्यात गेली 10 वर्षापासुन जट झाली होती.जट कापल्यास अनर्थ घडेल असे सांगुन मनात भीती निर्माण केली असल्यामुळे त्या जट काढण्यास तयार नव्हत्या.जटेमुळे खुप चिडचिड होत होती.मानसिक त्रासही वाढत होता. आज रोजी त्यांचे समुपदेशन करून  मनातील भीती दुर करून करूणाताईच्या डोक्यातील जट काढण्यास यश आले.
    या महिलेचे समुपदेशन बारामती येथील जोगती रितेश साबळे,नबी शेख, श्रेया साळवे,रेणुका सूर्यवंशी यांनी करूणा ताईच्या मनातील भीती दूर करून जट काढण्यासाठी तयार केले.
     जट निर्मूलन करताना महा.अंनिसचे बारामती शाखेचे कार्यकर्ते प्रा. डाॅ.सरवदे,बाळकृष्ण भापकर,कांबळे टी.आर,हिंगसे आप्पा,सुनिल महामुनी,रमेश शिरसाट,मोहन लांडगे,कमल कांबळे,सोनाली पाळेकर,नबी शेख,श्रेया साळवे,रेणुका सुर्यवंशी,रितेश साबळे,नगरसेविका सौ.मयुरी सुरज शिंदे या सर्वाच्या उपस्थितीत नंदिनी जाधव यांनी जट निर्मूलन केले,
                                       नंदिनी जाधव
                                महा.अंनिस. कार्यकर्ती
                                     9422305929

No comments:

Post a Comment