30 जानेवारीला हुतात्मा दिनास उपस्थित राहण्याचे आवाहन..
बारामती:- दि. ३० जानेवारी १९४८ मध्ये प्रार्थना सभेत महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. ज्या महात्मा गांधीजींनी साधी राहणी व उच्च
विचार सरणी अंगीकृत करून या देशातील गरीब जनतेला अंगावर नेसावयास कपडा नसल्याने स्वतः साधा खादीचा पंचा व खादीचे उपरणे परिधान केला. आपल्या भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था ग्रामस्वराज्य या दृष्टीने त्याकाळात बळकट होती ती ब्रिटीशांनी उध्दवस्त केली. तीचे पुर्नजीवन करण्याचा महात्मा गांधीजींनी ध्यास घेतला होता. तसेच त्यांनी स्वच्छतेचे महत्व त्याकाळी सांगितले होते. त्यांची आज देशाला गरज आहे. तरी सर्वांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. म्हणजे संपूर्ण देश स्वच्छ व सुंदर होईल व भारतातील प्रत्येक नागरिकाने कमीत कमी एकतरी खादीचा पोषाख परिधान करावा हीच खरी महात्मा गांधींना श्रध्दांजली होईल व महात्मा गांधीचे स्वप्न पूर्ण होईल. संपूर्ण जगामध्ये या महामानवाचे अनेक देशात त्यांची स्मृती आणि आठवण साजरी केली जाते. अनेक जागतिक ज्येष्ठ विचारवंतांनी असे कथन केले आहे की, अशा प्रगल्भ विचारांचा आणि कृतिशीलतेचा माणुस की जो हाडामासांनी शरीर बनलेला असा होवुन गेला यावर शरीर विज्ञान ही आश्चर्य व्यक्त करील. जरी ३० जानेवारी १९४८ साली महात्मा गांधीजीचे शरीर संपविण्यात आले तरी त्यांचे विचार आणि आचार हेच आजच्या घडीला तारूण नेवू शकतील आणि म्हणून आजच्या या स्मृतिदिना दिवशी हुतात्मा दिन म्हणून ओळखले जाते व सकाळी १० वा ५९ मि. ते ११ वाजेपर्यंत प्रथम सायरन वाजविणेत येईल त्यानंतर २ मिस्तता पाळावी व त्यानंतर पुन्हा ११ वा २ मि. ने सायरन चालू होवून ११ वा. ३ मि. सायरन समाप्त होईल त्यानंतर वंदेमारतम् हे गीत होईल. सर्व जगात हुतात्मा दिन साजरा करून महात्मा गांधीजींचे आचार विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी शपथबध्दं होऊया.बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना, बारामती हे १९४९ सालापासुन हुतात्मा दिन पाळत आले आहेत. सदरील दिवशी भारतामध्ये भारत देश स्वातंत्र्य करण्यापासुन ते आजपर्यंत भारत देशाची सेवा करताना ज्यांनी ज्यांनी स्वतःचे प्राणाची आहुती व बलिदान दिले आहे त्यांचे
कृतज्ञता व आठवण व्यक्त करण्यासाठी व नविन येणाऱ्या पिढीला जुन्या इतिहासाची माहिती मनामध्ये ज्वलंत राहण्यासाठी श्रध्दांजलीचा कार्यक्रम दि. ३० जानेवारी रोजी संपूर्ण देशात हुतात्मा दिन म्हणून होत असतो. हुतात्मा दिन हा नुसता भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात ३० जानेवारी रोजी भारताच्या वेळेनुसार सकाळी १० वा. ५९ मि. ते ११ वा. २ मि. स्तब्धता पाळुन हुतात्मा दिन पाळला जातो.बारामतीमध्ये बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने हुतात्मा दिनाचा कार्यक्रम रविवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०. ५९ मि. ते ११ वा. ३ मि. हुतात्मा स्तंभ, वंदेमातरम् चौक (भिगवण चौक) या ठिकाणी होणार आहे. तरी बारामतीतील सर्व नागरीकांनी, बारामती नगरपरिषद अध्यक्षा, उपाध्यक्षा, नगरसेवक, मुख्याधिकारी व सर्व कर्मचारी, बारामती शहर पोलीस स्टेशन, अधिकारी, कर्मचारी, सरकारी, निमसारकारी, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, पत्रकार,संपादक,बॅकेचे अधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कॉलेजचे संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, कामगार संघटना, सर्व स्तरातील सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, गणेश मंडळ, दहिहंडी संघाचे अध्यक्ष, कार्यकर्ते इ. सर्व बारामतीतील तळागाळातील घटकांनी या दिवशी हुतात्मा
दिनास राष्ट्रीय पोशाखात १५ मि. अगोदर उपस्थित रहावे असे स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निलेशभाई कोठारी तर्फे आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे.
टिप:- सरकारी ऑफिस, बँक, शाळा, महाविद्यालय यांनी आपल्या आवारात दोन मिनिटे सकाळी १० वा. ५९ मि. ते ११ वा. २ मि. स्तब्धता पाळुन हुतात्मा दिन साजरा करावा.तसेच हुतात्मा स्तंभ वदेमातरम् चौक, (भिगवण चौक),बारामती.सकाळी १० वा. ५९ मि.दि. ३०/०१/२०२३ वार सोमवारी हजर राहण्याचे आवाहन निलेशभाई कोठारी-
बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व
बारांमती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना यांनी निवेदनाद्वारे केले.
No comments:
Post a Comment