महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे उपस्थित 5 जानेवारीला बारामतीत ओबीसी मेळावा... बारामती:- बारामती येथे काँग्रेस कमिटी मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी बारामती शहरांमध्ये पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी बारामती शहरांमध्ये ओबीसी मेळावा संदर्भात पत्रकार परिषद व नियोजन बैठक लावली असता बारामती मध्ये प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे जंगी स्वागत करण्याचे उपस्थित बारामती व पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी बारामती मध्ये काँग्रेस बळकटीचे ध्येय वर्ष बाळगून मोठ्या प्रमाणात संघटन करण्याचे नंदकुमार कुंभार प्रदेश काँग्रेस सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली करण्याचे ठरले या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे कुंभार यांनी आवाहन केले याचबरोबर नानाभाऊंचे विविध गावी सत्कार करण्याचे नियोजन या मीटिंगमध्ये ठरले पाच तारखेचा कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ यांच्या समवेत ओबीसी प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष भानुदाजी माळी तसेच पुरंदरचे आमदार व पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप तसेच आमदार संग्राम दादा थोपटे, माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे, माजी आमदार दीप्ती ताई चौधरी, माजी आमदार मोहनदादा जोशी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जैसा बाई मोटवानी याबरोबर महाराष्ट्रातील इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत असे नंदकुमार कुंभार यांनी सांगितले सदरच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित हरिभाऊ पाटील सोलापूर काँग्रेस उपाध्यक्ष, राजेंद्र रुपनवर सोलापूर काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष, गिरीश शेटे प्रदेश सचिव ओबीसी विभाग तसेच अनिल पाटील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ निंबाळकर अध्यक्ष बारामती तालुका काँग्रेस, आकाश मोरे प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश, बाळासाहेब देवकाते माजी अध्यक्ष बारामती काँग्रेस, बाळासाहेब मगर तालुका उपाध्यक्ष माळशिरस, योगेश महाडिक काँग्रेस अध्यक्ष बारामती शहर, सुरज भोसले पुणे जिल्हा युवक सरचिटणीस, वैभव बुरुंगले युवक तालुका अध्यक्ष काँग्रेस, धवल गाडे प्रदेश सचिव काँग्रेस, बिलाल बागवान पुणे जिल्हा उपाध्यक्ष विभाग, निलेश गजरमल बारामती तालुक्यातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचं स्वागत महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार पुणे जिल्हा ओबीसी विभाग अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांनी केले.
Post Top Ad
Monday, January 2, 2023
Home
ताज्या घडामोडी
बारामती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे उपस्थित 5 जानेवारीला बारामतीत ओबीसी मेळावा...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे उपस्थित 5 जानेवारीला बारामतीत ओबीसी मेळावा...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment