खळबळजनक.. मुलाने मुलीला पळवून
नेल्याच्या रागातून एकाच कुटुंबातील 7 जणांनी केली आत्महत्या..!
दौंड :- तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेलं या घटनेची माहिती पुढे आली ती धक्कादायक होती,मुलाने मुलगी पळवून नेल्याच्या रागातून वडिलांसह कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडली आहे. पती,पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह 3 लहान मुलांचे मृतदेह भीमा नदीपात्रात सापडले आहे. या घटनेमुळे
दौंड शहरात खळबळ उडाली आहे.मयताच्या मुलाने मुलगी पळवून नेली होती. त्याने मुलगी परत न आणल्याने वडिलांसह अन्य 6 जणांनी
टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील आहे.पती-पत्नी, मुलगी-जावई यांच्यासह त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते. त्यावेळी घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र,पोलीस चौकशीनंतर आत्महत्या असल्याचे समोर आलं आहे. 17 जानेवारी रोजी रात्री 7 जणांनी भीमा नदीत
आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये
भीमा नदीपात्रात मागील पाच दिवसामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह
आढळून आले होते. ही घटना ताजी असतानाच याच कुटुंबातील बेपत्ता असलेल्या तीन लहान मुलांचे मृतदेह मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास आढळून आले आहेत. आढळून
आलेल्या मृतदेहांमध्ये दोन पुरुष दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. गेल्या सहा दिवसात सात मृतदेह आढळून आल्याने
परिसरात भितीचे वातावरण आहे.मोहन उत्तम पवार (वय 45). संगीता उर्फ शहाबाई
मोहन पवार (वय 40 दोघे रा. खामगांव ता. गेवराई जि. बीड), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (वय-28) त्याची पत्नी राणी शामराव फुलवरे (वय-24) त्यांचा मुलगा रितेश उर्फ भैय्या शामराव फुलवरे (वय-7), छोटू फुलवरे (वय-5), कृष्णा (वय-3 सर्व रा.हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी मृत्यू झालेल्या सात जणांची नावे आहेत. हे सर्वजण मागील एक वर्षापासून पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहून मजुरी काम करीत होते.बुधवारी दि.18 रोजी भीमा नदीपात्रात स्थानिक मच्छीमार मासेमारी करत असताना त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर शुक्रवारी दि.20 रोजी पुरुषाचा मृतदेह आढळला. शनिवारी दि. 21 रोजी पुन्हा एका महिलेचा तर रविवारी दि.22 रोजी एका
पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पाच दिवसात चार मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.त्यातच मंगळवारी दि.24 रोजी पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह नदीपात्रात आढळून आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची पथके तपासासाठी रवाना केली.दरम्यान रविवारी सापडलेल्या मृतदेहाजवळ एक चावी तर दुसऱ्या मृतदेहाजवळ मोबाईल आणि सोने खरेदीची पावती सापडल्याचे यवत पोलिसांनी सांगितले.
यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, नदी पात्रात सापडलेल्या चार मृतदेहांचे
शवविच्छेदन करण्यात आले आहे.त्यांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.चारही मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे.पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे करीत आहेत.
No comments:
Post a Comment