भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ अर्चना पाटील यांच्यावर भाजपने दिली मोठी जबाबदारी ... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 1, 2023

भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ अर्चना पाटील यांच्यावर भाजपने दिली मोठी जबाबदारी ...

भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ अर्चना पाटील यांच्यावर भाजपने दिली मोठी जबाबदारी ...                                              बारामती :- भारतीय जनता पक्षाने इंदापूर येथील डॉ अर्चना पाटील यांच्यावर ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून मोठी जबाबदारी दिली आहे, निवडीचे पत्र ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी दिले मागील काही महिन्यांमध्ये डॉ पाटील यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. डॉ अर्चना पाटील यांचे आजोबा दिनकरराव पाटील  यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात शंकरराव पाटील यांनी  निवडणूक लढवली होती त्यावेळी शंकरराव पाटील यांचा विजय झाला होता  अतिशय अटीतटीची झाली होती. इंदापूर तालुक्यातील लासूर्णे गावातील पाटील घराणे बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाते. डॉ अर्चना पाटील यांच्या निवडीने इंदापूर तालुक्यात तसेच बारामती लोकसभा मतदार संघात सुशिक्षित महिला ओबीसी चेहरा भाजपला मिळाला आहे, भाजपने  त्यांची ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून मिशन बारामतीला आणखी बळ मिळाले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ अर्चना पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देऊन, राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले आहे, डॉ  पाटील यांनी बारामती लोकसभा मतदार संघात ओबीसी समाजासाठी अनेक मेळावे, गावभेट दौऱ्यानिमित संपर्क वाढवला आहे. या निवडी मुळे  भाजपची इंदापूर तालुक्यात ताकत वाढणार आहे.  

यावेळी डॉ अर्चना पाटील यांनी भाजपने मोठी जबाबदारी दिल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे, इंदापूर, तालुका व बारामती लोकसभा मतदार संघामध्ये ओबीसी समाजाची ताकत भाजपच्या मागे उभी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment