'वेड' इतकं का व्हायचं प्रेमात की ती तो आहे हे समजलंच नाही! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 11, 2023

'वेड' इतकं का व्हायचं प्रेमात की ती तो आहे हे समजलंच नाही!

'वेड' इतकं का व्हायचं प्रेमात की ती तो आहे हे समजलंच नाही!
मुंबई:- प्रेमात वेड्या झालेल्या अनेक घटना आहेत, अशीच एक आगळीवेगळी घटना पुढे,एकमेकांच्या प्रेमात असलेल्या
व्यक्ती एकमेकांसाठी काहीही करू शकतात, असं
म्हटलं जातं. काहींना आपल्या प्रेमासाठी मृत्यू
पत्करल्याचीही काही उदाहरणं इतिहासामध्ये
आढळतात. मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाची अशाच एका प्रेमात वेड्या झालेल्या तस्कराशी गाठ पडली आहे. हा तरुण अंमली पदार्थांची तस्करी करत असताना पकडला गेला आहे. आपल्या प्रेयसीसाठी आपण हे काम करत असल्याचं त्याचं म्हणणं होतं. पण, हा तरुण
एका पुरुषाकडूनच हनीट्रॅप झाल्याचं पुढील तपासात समोर आलं आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, कस्टम विभागानं 6 जानेवारी रोजी मुंबई विमानतळावर 28 कोटी रुपये किमतीच्या कोकेनसह एका तरुणाला पकडलं आहे.
त्याच्याकडून 2 किलो 810 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर 28 कोटी रुपये किंमत असलेलं हे कोकेन एका डफल बॅगमध्ये लपवण्यात आलं होतं. कस्टम अधिकाऱ्यांनी या तरुणाची चौकशी केली असता तो म्हणाला की, 'आधी मला माझ्या
प्रेयसीशी भेट घालून द्या मग मी सर्व काही सांगेन'. या तरुणाची सोशल मीडियावर एका परदेशी महिलेशी मैत्री असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळेच तो ड्रग स्मगलर बनला.या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, आरोपी तरुणाची फेसबुकवर एका महिलेशी ओळख झाली होती. या महिलेनं त्याला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं.त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्याचं आणि पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. त्यामुळे हा तरुण पूर्णपणे महिलेच्या प्रभावाखाली आला. यानंतर त्याला इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा विमानतळावर कोकेननं भरलेली बॅग देण्यात आली. ही बॅग तो दिल्लीतील एका व्यक्तीपर्यंत पोहोचवणार होता. मात्र, त्या पूर्वीच तो मुंबईत पकडला गेला. तपासात समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे, जी महिला अनेक महिन्यांपासून या तरुणाशी फोनवर रोमँटिक
संभाषण करत होती, ती मुलगी नसून एक मुलगा आहे.तो मुलगा आवाज बदलणारं सॉफ्टवेअर वापरून आरोपी तरुणाशी संवाद साधत होता. या प्रकरणातील आरोपी तरुणाची ओळख स्पष्ट
झालेली नाही. मात्र, तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावध राहिलं पाहिजे. एकदम अनोळखी व्यक्तीशी फार जवळीक साधली तर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ येऊ शकते, हे या प्रकरणातून लक्षात येतं. त्यामुळे तरुणांनी सावध रहावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment