*ठाणे शहर सुंदरीकरणं चित्रकार श्री.संभाजी जाधव समाज गौरव पुरस्काराने सन्मानित....* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 7, 2023

*ठाणे शहर सुंदरीकरणं चित्रकार श्री.संभाजी जाधव समाज गौरव पुरस्काराने सन्मानित....*

*ठाणे  शहर  सुंदरीकरणं चित्रकार श्री.संभाजी जाधव समाज गौरव पुरस्काराने सन्मानित....*
 ठाणे : - मराठी पत्रकारितेचे  जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर  यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दिनांक 06/01/2023 रोजी    साप्ताहिक ठाणे नवादूत तर्फे मराठी ग्रंथ  संग्राहालय ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात अनेक नामवंताना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या स्वप्नातील मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे  या अभियाना अंतर्गत ठाणे शहर सुंदरीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून ठाणे शहरातील कळवा ब्रिज, नितीन कॅडबरी, तीन हात नाका, ब्रिजच्या छतावरील अप्रतिम चित्रकला तसेच ठाणे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्ते, शाळा, कॉलेज यांच्या भिंतीवर टू डी, थ्री डी चित्रे सकारूनठाणे शहराचे  सुशोभीकरण करणाचे काम जोरात चालू आहे.
 ठाणे महानगर पालिका आयुक्त मा. अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे  सर्व अधिकारी, इंजिनियर, smc कम्पनीचे  सेक्रेटरी मा. शिवाजीराव देसाई, लोटसचे ऋषिकेश डोळे साहेब, आर्टिस्ट पंकज चव्हाण  यांच्या मार्गदर्शनाखाली  आर्टिस्ट श्री. संभाजी जाधव आणि त्यांची टीम आर्टिस्ट अविनाश घाणेकर, सूरज नेपाळी, अवंतिका, अनिल, तसेच अनेक कलाकार ठाणे सुंदरीकरणाचे काम अतिशय उत्कृष्टरित्या करत असून शहर सुंदरीकरणात मोलाचे योगदान दिल्याबद्दल चित्रकार श्री. संभाजी जाधव यांना समाज गौरव  पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले असून सर्व स्थरातून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  सदर कर्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ संपादक ठाणे जिल्हा, नवी मुंबई, व्यापारी उद्योजक मंडळाचे अध्यक्ष मा. चंद्रकांत भोईटे, ठाणे काँग्रेस लीगल सेल अध्यक्ष ऍड. दरम्यानसिंह बिस्ट तसेच सर्व पक्षीय नगरसेवक, पत्रकार, साहित्यिक, नामवंताच्या उपस्थितीत साप्ताहिक ठाणे नवादूतचे  संपादक दिनेश  जोशी यांनी संभाजराव जाधव  यांना समाजगौरव  पुरस्कार प्रदान केला त्यावेळी ठाणे शहर पहिल्या नंबर वर आणण्याचा निश्चय केला.

No comments:

Post a Comment