*स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन*
पुणे, दि. ६:- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौंड तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांमध्ये २१८ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबतचा जाहिरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://pune.gov.in वर उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना फॉर्म आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधीत तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत.
तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत; मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी कळवले आहे.
No comments:
Post a Comment