बारामती नगरपरिषद हद्दीमधील (तांदुळवाडी) बेलदार पाटील चौक ते तलाठी कार्यालय रोडवर स्ट्रिट लाईट तातडीने बसविण्याची भाजप महिला आघाडीची मागणी..
बारामती:- बारामती शहर हद्दीतील तांदुळवाडी
गावातील बेलदार पाटील चौक ते तलाठी कार्यालय रोडवर स्ट्रिट लाईट नसल्याने या भागात चोरांचे प्रमाण वाढले असल्याने तसेच या रस्त्यावरून सतत रहदारी चालु असून जेष्ठ नागरिक व महिला या रस्त्याने फिरायला येत असतात. त्यावेळी अंधाराचा फायदा घेवून साखळी चोरांना नाहकबळी पडावे लागते. तसेच या भागात अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने तत्काळ तेथे स्ट्रिट लाईट बसविण्यात यावे
अन्यथा महिलांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी अश्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी च्या महिला आघाडीच्या वतीने बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना देण्यात आले यावेळी लक्ष्मी (पिंकीताई) मारूती मोरे-संपर्क प्रमुख, महिला आघाडी, बारामती शहर, भाजप,सुनीताताई झेंडे ,सारिकाताई लोंढे ,पांडुरंग मामा कचरे,संतोष जाधव.महेश नेटके, चंद्रकांत केंगार. साक्षीताई काळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment